वीज बिलात कोणतीही तडजोड नाही, १०० % वीज बिलाची वसुली करा: मुख्य अभियंता - सुरेश गणेशकर

नवी मुंबई - दिवसंदिवस वाढत चाललेली महावितरणच्या वीज बिलाची थकबाकी व वसुलीबाबत, तसेच लाईनस्टाफला अजून वेगाने काम करण्याबाबत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पनवेल विभागातील भिंगारी, कळंबोली, खारघर, पनवेल शहर, उरण येथील लाईनस्टाफची आढावा बैठक १७ फेब्रुवारी रोजी पनवेल विभागीय कार्यालयात घेतली. यावेळी, वाशी मंडलाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने, पनवेल शहर विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

              महावितरण भांडूप परिमंडलातील अनेक ग्राहकांनी एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांच्या काळात एकही वीज बिल भरले नाहीत. भांडूप नागरी परिमंडलात लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक, घरघुती तसेच सार्वजनिक विभागातील १ लाख ६३ हजार ग्राहकांकडे एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्यांच्या वीज बिलाची १७५.४७  कोटी रुपयांची थकबाकी होती. यामध्ये पनवेल विभागातील ग्राहकांकडे ३४ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकीचा समावेश आहे. महावितरणची आर्थिक स्तिथी बिकट झाली असून ज्या ग्राहकांनी एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत एक ही वीजबिल भरले नाहीत अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम दिनांक १ फेब्रुवारी २०२१  पासून सुरु आहे. तसेच वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पनवेल विभागात दहा दिवसाच्या वसुली नंतर सध्या १४ कोटी ३६ लाखाची थकबाकी आहे. पनवेल विभगातील भिंगारी, कळंबोली, खारघर, पनवेल शहर, उरण येथील एकूण ७५५६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. सध्याची स्तिथी लक्षात घेऊन, महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ही मोहीम अजून तीव्र करून युद्धपातळीवर वीज बिलाची वसुली करण्याबाबत सूचना करण्यसाठी व लाईनस्टाफना चांगली कामे करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता येथील लाईनस्टाफची आढावा बैठक घेतली. यावेळी, खारघर उपविभागाने १००% ग्राहकांची वीज जोडणीची तपासणी केल्याबद्दल शाखा अभियंता गौरी वजरकर व त्या उपविभागातील  कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Popular posts
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून नेरुळ विभाग अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांविरुध्द कारवाई,दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल सामान जप्त, झोपडी धारकांना स्थानिक पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून हटवण्यात यश , नेरुळ विभाग अतिक्रमण विभागाच्या बेधडक कारवाईची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज ?
Image
<no title>
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image