नवी मुंबई - वाशी कोपरखैरणे मार्गालागत एच.पी.सिलेंडरच्या अनेक गाड्या उभ्या राहत असल्याने त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे संबंधित एच.पी.गॅस एजन्सी मालकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रदीप बी.वाघमारे यांनी केली आहे.
वाशी कोपरखैरणे मार्गालागत माता गावदेवी मंदिर शेजारी एच.पी.घरगुती गॅस सिलेंडर वितरण एजन्सी आहे. हा एजन्सी मालक गेल्या अनेक वर्षा पासून वाशी कोपरखैरणे मार्गालागत सिलेंडरने भरलेले ट्रक रोडच्या बाजूला उभे करून त्या ट्रकमधून सिलेंडर वितरणाचे काम करत आहे.अनेक वेळा शेजारील एच.पी.पेट्रोल पंपावर सुद्धा गाड्या उभ्या केलेल्या दिसतात. या उभ्या करण्यात आलेल्या मोठ्या गाड्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघात झालेले आहेत. परंतु नवी मुंबई महानगर पालिका विभाग कार्यालय आणि पोलिस वाहतुक वाशी शाखेच्या डोळेझाक पणामुळे या गाड्यांवर कधीच कारवाई केली जात नाही. गेल्या भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून शिवसेना उपशहर प्रमुख प्रदीप बी.वाघमारे यांनी गाड्यांवर दंडात्मक कारवाई करावी म्हणून गॅस एजेंसी शेजारीच असलेल्या नवी मुंबई महानगर पालिका वाशी विभाग कार्यालय व वाशी पोलीस वाहतूक शाखेला निवेदन दिले होते.परंतु आजतागायत सदर सिलेंडरच्या ट्रकवर कसल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. गॅस सिलेंडर एजन्सी मालकाने गॅसचे सिलेंडर साठवण्यासाठी गोडावूनची व्यवस्था करावी लागते तसेच अचानक आग लागली तर संभाव्य धोका टाळण्यासाठी विशेष फायरची व्यवस्था करावी लागते परंतु कसलीच काळजी न घेता हा वितरक बिनधोक लोकांच्या जीवाशी खेळत आहे.ही गॅस एजेंसी जुहूगाव येथे नागरी वस्तीत आहे व येथे फायर फायटिंग कसलीच काळजी घेण्यात आलेली नाही असे निदर्शनात येत आहे. सदर एच.पी.सिलेंडरच्या ट्रक जुहूगावच्या मागील रोडवर अनेक वेळा उभ्या केलेल्या दिसतात.नुकतेच मुंबई दोन ठिकाणी गॅस सिलेंडरचे स्फोट होऊन अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आले होते. असाच प्रकार भविष्यात वाशीतही घडू शकतो. परंतु नवी मुंबई महानगर पालिका वाशी विभाग कार्यालयाचा अगदी शेजारी असलेल्या आणि वाशी पोलीस वाहतूक शाखेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्मचाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.भविष्यात जर या ठिकाणी काही एखात झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही वाशी पोलीस शाखा आणि वाशी विभाग कार्यायाची असेल असे प्रदीप बी.वाघमारे यांनी म्हटले आहे.तात्काळ जागेवर जाऊन पंचनामा करून सदर गाड्यांवर जप्तीची कारवाई करावी तसेच गॅस एजेंसी मालकावरही नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रदीप बी. वाघमारे यांनी केली आहे