राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेच्या अध्यक्षपदी योगेश महाजन यांची निवड


नवी मुंबई - सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन दरबारी व्यथा मांडणाऱ्या योगेश महाजन यांची राजे प्रतिष्ठान कामगार सेना प्रणित राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.योगेश महाजन हे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या ठाणे जिल्हा पदावर कार्यरत असून त्याचबरोबर या पदाला साजेशी अशी उत्तम कामगिरी ते पार पाडतील असे यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र चिटणीस चंद्रकांत धडके (मामा) यांनी सांगितले.

             नवी मुंबई महानगरपालिकेतील शेकडो सुरक्षा रक्षकांना नियमानुसार वेतन मिळावे यासाठी गेल्या अनेक महिण्यापासून मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पाठपुरावा सुरु असताना बेलापूर रेल्वे स्टेशनं कॉम्प्लेक्स मधील सुरक्षा रक्षकांना योग्य तो मोबदला मिळावा यासाठी योगेश महाजन यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळ व रायगड सुरक्षा मंडळ मधील वेटिंग वरील रक्षकांना लवकरात लवकर काम मिळावे यासाठीही महाजन यांचे प्रयत्न सुरु आहेत.यापुढे आता छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या आशिर्वादाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई,कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी,सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब,चिटणीस मंगेश लाड, सहचिटणीस केवल महाडिक यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण राज्यातील सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करत तमाम सुरक्षा रक्षक मंडळातील वंचित कामगारांना काम मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे योगेश महाजन यांनी सांगितले.

Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू