सुरक्षा रक्षकांचे पगार द्या,अन्यथा कंपनीवर कायदेशीर कारवाई करू - राजे प्रतिष्ठान


नवी मुंबई - महापालिकेतील उद्यान विभागात काम करणाऱ्या नमो फैसेलिटी सर्व्हिसेस या कंपनीच्या शेकडो सुरक्षा रक्षकांना गेल्या दोन महिन्यांपासून मिळाला नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.सदर बाब राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे अध्यक्ष योगेश महाजन यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी कंपनीला सुरक्षा रक्षकांचे लवकरात लवकर पगार करण्याचे निर्देश दिले आहे.जर तसे झाले नाही तर कंपनीवर रीतसर गुन्हा दाखल करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

              नवी मुंबई मनपा उद्यान विभागात झालेला गैरव्यवहार राजे प्रतिष्ठानने चव्हाट्यावर आणला असता त्यात आतापर्यंत तिघांना निलंबित करण्यात आले असून इतरांची चौकशी सुरु आहे.त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच उद्यान विभागातील गदारोळ समोर आला आहे.मनपाच्या उद्यान विभागात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक कामगारांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतनच अदा करण्यात आलेलं नसल्याची बाब समोर आली आहे.या विभागात बेकायदेशीर रित्या नमो फैसेलिटी सर्व्हिसेस या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले असून त्यांना वेतन व इतर सुविधाही नियमाप्रमाणे देण्यात येत नाहीयेत.सुरक्षा रक्षक मंडळाच्या नियमानुसार या सुरक्षा रक्षकांना वेतन मिळणे गरजेचे असतांना त्यांना ९ ते १० हजार रुपये देण्यात येत आहेत.तेही त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून मिळालेच नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.याप्रकरणी कामगारांनी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे अध्यक्ष योगेश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला.या प्रकरणी कंपनीचे कर्मचारी सूरज सिंग यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी १५ तारखेपर्यंत पगार मिळतील असे सांगितले.मात्र त्या अगोदर मिळण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.त्यावर कामगारांचे पगार लवकर करा असे सांगत जर त्यात हलगर्जीपणा झाल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा यावेळी योगेश महाजन यांनी दिला आहे.

Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image