मिस नवी मुंबई सौदंर्यवती स्पर्धेची दहा वर्षाची शृंखला, कोण जिंकणार मिस नवी मुंबई दहाव्या पर्वाचा मुकूट

नवी मुंबई - शहराची सांस्कृतिक वारसा जपणारी व ठसा उमटवणारी मिस नवी मुंबई ही सौदंर्य स्पर्धा दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या सौदंर्य स्पर्धेने या कालावधीत कित्येक सौदंर्यवतीना राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली आहे. यु अँड आय एन्टरटेन्टमेंट या संस्थेने दर्जात्मक व सातत्याने ही स्पर्धा आयोजित करीत एका उंचीवर आणून ठेवली आहे. असे म्हणतात जर तुम्ही जिंकण्यासाठी समोर येत नसाल तर तुम्ही कधीच जिंकणार नाहीत व सामान्य म्हणून जगाल. जे जिंकण्यासाठी तत्पर आहेत त्यांच्या जिद्दीला , पुढाकाराला पंख देण्यासाठी मिस नवी मुंबई ही सौदंर्य स्पर्धा पाठबळ देते.

               या माध्यमातून कित्येक सौन्दर्यवतींना आत्मविश्वास तर मिळालाच तसेच त्यांनी स्वतःचे नाव कमविले आहे. मिस इंडिया ची विजेती सुमन राव, रियॅलिटी शो मध्ये गाजलेल्या दिव्या अग्रवाल, अक्षता सोनावणे आणि कविता मिश्रा यांनी सुद्धा आपली सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे."या स्पर्धेतून पुढे गेल्यानंतर आंतराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व ज्या सौदंर्यवती करणार आहेत. अश्या अंतिम फेरीसाठी सोळा गुणवान सौदंर्यवती निवडणेतही शेकडो मुलीं मधून हे काम अत्यंत कठीण होते. या करीता आमची तज्ञ टीम रात्रंदिवस मेहनत घेत त्यांना अंतिम फेरी करीता सज्ज करतात. या मध्ये आम्ही कोणतीच कसुर ठेवत नाही अशी माहीती यु अँड आय एन्टरटेन्टमेंटचे सर्वेसर्वा व स्पर्धेचे आयोजक हरमीत सिंग यांनी पत्रकार परिषेदत दिली. वाशीच्या फोर पॉईंट या पंचतारांकित हॉटेल मध्ये अंतिम फेरीत पोहचलेल्या सोळा सौदंर्यवतीना घोषित केले.त्या पुढील प्रमाणे आहेत ऐश्र्वर्या नायडू ,आंषिका अग्रवाल,अपर्णा पाठक ,गौरी गोठणकर, हर्षदा माळी, हर्षिता पुजारी, जान्हवी कदम, पायल रोहेरा, पूजा पुजारी, प्रिया चव्हाण, संयुंक्ता पावस्कर,श्रुती अहिर, सिस्मिता पुजारी, सृष्टी बन्नाट्टी, उर्जिता मोरे, योगिता राठोड.पत्रकार परिषदेत फोर पॉईंट चे संचालक राहुल बनसोडे यांनी सांगितली कि "मिस नवी मुंबई व यु अँड आय यांच्याशी आम्ही बरेच वर्षापासून काम करीत आहोत. शहराची ओळख बनलेली ही स्पर्धा आपल्या शहराचे नाव सातासमुद्रापार गाजवत असल्याचा आम्हाला अभिमान आहे"यावेळी डॉक्टर संजीव कुमार ,उद्योजक अशोक मेहरा, डॉक्टर वंदना जैन उपस्थित होत्या. मिस नवी मुंबईच्या दहाव्या पर्वाची अंतिम स्पर्धा ही शनिवार २७ फेब्रुवारी २०२१ रोजी वाशीच्या फोर पॉईंट हॉटेल येथे संपन्न होणार आहे. अंतिम स्पर्धेत ज्या सोळा सौंदर्यवती जिंकण्यासाठी सज्ज आहेत त्यांना रॅम्पवॉक चे प्रशिक्षण स्मृती भतिजा देणार आहे. यापूर्वी तिने मिस इंडिया २०१९ च्या स्पर्धकांना प्रशिक्षण दिले होते. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास ही गोष्ट या स्पर्धेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची असते त्यामुळे मानसोपचार तज्ञ इंद्रप्रीत कौर गुप्ता स्पर्धकांना आपला आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी प्रशिक्षण देतील.

Popular posts
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
*स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने समाविष्ट विशेष कॅटेगरीत, देशातील तीन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश - महाराष्ट्रातील एकमेव शहर*
Image
नवीन कायद्याचा वापर करुन देशामध्ये असलेला पहिला क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांपुढे आव्हान राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्व कटिबध्द - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image