योगिता राठोड ठरली मिस नवी मुंबई दहाव्या पर्वाची विजेती


नवी मुंबई - मिस नवी मुंबईच्या आठव्या पर्वाचा अंतिम सोहळा शनिवारी वाशी येथील फोर पॉईंट हॉटेल मध्ये कोविड विषयक खबरदारी घेत मोठ्या थाटात संपन्न झाला. या वेळी सोळा सौंदर्यवतीनी आपल्या दिलखेच अदानी परीक्षक व प्रेक्षकांना मोहून टाकले. वेगवेगळ्या तीन फेऱ्या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी मुंबई २०२१ चा ताज योगिता राठोड या सोंदर्यवतीने पटकावला. सोबतच दुसऱ्या व तिसऱ्या जागेवर अनुक्रमे पायल रोहेरा व अपर्णा पाठक हिने बाजी मारली.परीक्षक म्हणून लिव्हा मिस दिवा सुपरनॅशनल २०२० ची विजेती अवृत्ती चौधरी,मिस आईशिया इंडिया २०१८ ची विजेती सिमरण म्हलहोत्रा , मिसेस इंडिया ब्युटी क्विन ची विजेती व अभिनेत्री डॉ. इलाक्षी मोरे,संजीव कुमार,अशोक मेहरा यांनी महत्वपुर्ण भूमिका पार पाडली.

                   या स्पर्धेचे हे दहावे पर्व होते कोविड मुळे सर्व खबरदाऱ्या घेत आम्ही या स्पर्धेला खंड पडू दिला नाही. या करीत आम्हाला फोर पॉईंट हॉटेल ने खूप सहकार्य केले तसेच आमचे प्रायोजक ,दर्शक तसेच पुर्ण टीम ला सुद्धा मी धन्यवाद देईल. पुढच्या वर्षी आम्ही नवी मुंबईकरांना आगळावेगळा सोहळा अनुभवास देऊ.या वर्षी शेकडो मुलींनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदविला आणि यापैकी सर्वच फेरीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या सोळा सौंदर्यवती अंतिम फेरीत गेल्यात. या माध्यमातून आम्ही सामान्य घरातील मुलींना एक व्यासपीठ निर्माण करून देत आहोत ज्या माध्यमातून मनोरंजन व फॅशन क्षेत्रात आमचे स्पर्धक या पूर्वी चमकलेत ."अशी माहिती आयोजक यू अँड आय एन्टरटेन्टमेंट चे हरमीत सिंग यांनी दिली.मनमित सिंग यांच्या संन्यास या बँड ने आपल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. विशेष म्हणजे या स्पर्धेची तिसरी फेरी लाईव्ह बँड च्या गायनावर सादरीकरण झाले. या बँड मध्ये गायक मनमित सिंग यांना साथ मिळाली ती सोहम दोशी(ड्रमर), रोहन जाधव (लीड गिटारिस्ट),बॉक्सी (बास  गिटारिस्ट) आणि  हेमंत तिवारी (कीबोर्ड) या कलाकारांची.अंतिम स्पर्धेत ज्या सोळा सौंदर्यवती जिंकण्यासाठी  त्यांना रॅम्पवॉक चे प्रशिक्षण स्मृती भतिजा दिले. यापूर्वी तिने मिस इंडिया २०१९ च्या स्पर्धकांना प्रशिक्षण दिले होते. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास ही गोष्ट या स्पर्धेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाची असते त्यामुळे मानसोपचार तज्ञ इंद्रप्रीत कौर गुप्ता स्पर्धकांना आपला आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी प्रशिक्षित केले.तिन्ही वेगवेगळ्या फेरीत रिचा हावरे (राजकुमारी) नीता शर्मा (फॉरेव्हर प्रिटी ) आणि जेडी इन्स्टिटयूट ऑफ फॅशन वाशी अँड घाटकोपर यांनी डिझाईन केलेले ऑउटफिट परिधान करून रॅम्पवॉक केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा शेट्टी सेलेब्रिटी होस्ट हिने केले. 

इतर स्पर्धक उपविजेते

मिस ग्लोइंग स्किन - प्रिया चव्हाण

मिस उत्कृष्ट नयन - गौरी गोठणकर

मिस उत्कृष्ट बुद्धिमत्ता  - अपर्णा पाठक

मिस मिस स्वभावसाधर्म्य - अपर्णा पाठक

मिस इंटरनेट पॉप्युलर - संयुंक्ता पावस्कर

मिस स्टाईल आयकॉन - उर्जिता मोरे

गर्ल ऑफ दि शो - पायल रोहेरा

उत्कृष्ट रॅम्प वॉल्क - पूजा पुजारी

बॉडी ब्युटीफुल  - सृष्टी बन्नाट्टी

फ्रेश फेस अँड फोटोजेनिक  - योगिता राठोड

उत्कृष्ट हास्य - जान्हवी कदम


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image