मनसे स्टाईलने मिळाला शिवसैनिकाला न्याय


मनसे स्टाईलने मिळाला शिवसैनिकाला न्याय 
नवी मुंबई - मानखुर्द मधील शिवसेनेच्या महिला उपशाखाप्रमुख कामासाठी आपल्या सहकाऱ्यांसह वाशीतील फँटासिया मॉल मध्ये ऑल इंडिया सिक्युअर मेनेजमेंट अँन्ड बाउन्सर अँन्ड एअरपोर्ट कंपनीत कामासाठी आल्या असत्या त्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.यावर त्यांनी नवी मुंबईतील मनसैनिकांना मदतीचा हात मागितला असता मनसेचे पूर्ण ताकदीनिशी त्यांना मदत करत अखेर फसवणूक करणाऱ्या भामट्याला सापळा लावून पोलिसांच्या स्वाधीन केले.वाशी पोलिसांनी त्या भामट्यावर गुन्हा दाखल केला असून त्याने तब्बल ३२ जणांची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे.
                   सुंदरमकुमार अंजनीकुमार सिंग उर्फ करणं सिंग (२२) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून त्याचे वाशी सेक्टर ३० मधील फँटासिया मॉल मध्ये ऑल इंडिया सिक्युअर मेनेजमेंट अँन्ड बाउन्सर अँन्ड एअरपोर्ट जॉब नावाने कार्यालय आहे.या कार्यालयातून त्याने एअरपोर्ट, सेक्युरिटी, हाऊसकिपींग, अकाउंट मध्ये नोकरीस लावून देतो अशी जाहिरात केली असता या जाहिरातीला भुलून मानखुर्द मधील शिवसेनेच्या महिला उपशाखाप्रमुख त्याच बरोबर त्यांच्या काही सहकारी यांनी कामासाठी वाशी कार्यालय गाठले.तयाचवेळी कामासाठी काही रक्कम अगोदर भरावी लागेल असे सांगण्यात आले.कामाच्या आशेने काहींनी २ हजार तर काहींनी ५ हजार अशी रक्कम कार्यालयात भरली.त्यानंतर कामाला कधी यायचे याची कल्पना करणं सिंग याने न दिल्याने कामगारांनी वेळोवेळी कामासाठी कार्यालयाशी संपर्क साधला.मात्र त्यात त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.अखेर दिलेली रक्कम परत घेण्यासाठी कामगारांनी एक मार्च रोजी कार्यालय गाठले.त्यावेळी त्या ठिकाणी अनेक जण पैसे घेण्यासाठी अगोदरपासूनच उभे होते.यावर आपली फसवणूक झाली असल्याचे महिला शिवसैनिकाच्या लक्षात आले.सदर बाब त्यांनी मनसेचे सानपाडा मधील कार्यकर्ते सुरेश मढवी यांच्या निदर्शनास आणून दिली असता मढवी यांनी आपल्या सैनिकांसह सिंगचे कार्यालय गाठले आणि त्याला कामगारांचे घेतलेले पैसे परत देण्याची विनंती केली.यावर सिंग वेळ मारून न्यायला लागल्याने अखेर कामगारांसह मढवी यांनीही वाशी पोलीस ठाणे गाठत कामगारांना न्याय मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलिसांनीही करणंचा शोध घेण्यास सुरवात केली तर मैनीसैनिकांनी मनसे स्टाईलने करणं सिंगची फिल्डिंग लावली.अखेर दुपारपासून पळवाट आणि मनसैनिकांसह पोलिसांची दमछाक उडवणारा करणं सिंग रात्री आठच्या सुमारास मनसैनिकांच्या व पोलिसांच्या तावडीत अडकला.त्यावर त्याला ताब्यात घेत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावर मानखुर्द मधील शिवसेनेच्या महिला उपशाखाप्रमुख यांनी मनसेचे कार्यकर्ते सुरेश मढवी यांच्यासह, गणेश शिंदे, विशाल कदम यांच्यासह त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत.