एक मार्चपासून तिस-या टप्प्यातील लसीकरणास नवी मुंबईतही सुरुवात

नवी मुंबई - शासन निर्देशानुसार 16 जानेवारीपासून कोव्हीड 19 लसीकरणास डॉक्टर व इतर आरोग्यकर्मी कोरोना योध्यांपासून सुरुवात करण्यात आली असून दुस-या टप्प्यात पोलीस, सुरक्षा व पहिल्या फळीतील इतर कोरोना योध्यांना लसीकरण करण्यात येत आहे.यामध्ये शासकीय निर्देशाप्रमाणे एक मार्चपासून तिस-या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात करण्यात आलेली असून यामध्ये 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिक तसेच सहव्याधी (को - मॉर्बेडिटी) असणारे 45 ते 59 वर्ष वयाचे नागरिक यांना लसीकरण करण्यात येत आहे. 45 ते 59 वर्ष वयाच्या सहव्याधी असणा-या नागरिकांना लस घेण्याकरिता वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिक यांचे संबंधित प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारमार्फत सहव्याधी (को - मॉर्बेडिटी) निश्चित करण्यात आल्या असून यामध्ये पल्मनरी आर्टरी हायपरटेन्शन आणि हायपरटेन्शन / डायबेटीस ऑन ट्रीटमेंट, अंजायना आणि हायपरटेन्शन / डायबेटीस ऑन ट्रीटमेंट अशा व इतर आजारांचा समावेश आहे. केंद्र सरकारमार्फत वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिक यांच्याकडून घ्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना निश्चित करण्यात आला असून त्याच नमुन्यामध्ये प्रमाणपत्र सादर करणे / अपलोड करणे बंधनकारक आहे.

                  तिस-या टप्प्यातील लाभार्थ्यांची नोंदणी करताना ओपन स्लॉटमध्ये लाभार्थी स्वत:चा मोबाईल नंबर cowin.gov.in या वेबसाईटवर भरून त्यावरून येणा-या ओटीपी नुसार स्वत:ची नोंदणी करून घेऊन, लसीकरण सत्राची वेळ व दिनांक स्वत: निश्चित करू शकतात. त्याचप्रमाणे रिजव्हर्ड स्लॉटमध्ये ज्या लाभार्थ्यांना स्वत:हून नोंदणी करणे शक्य नाही असे लाभार्थी नवी मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या बुथवर स्वत: जाऊन आपली नोंदणी करून लस घेऊ शकतात. यावेळी बुथकरीता निश्चित केलेल्या क्षमतेनुसार लस देण्यात येईल.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐऱोली या सार्वजनिक रुग्णालयात (शासकीय रुग्णालय स्तर) कोव्हीड 19 लसीकरणाच्या तिस-या टप्प्याला सुरुवात झाली असून याशिवाय प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये अशा योजनांमध्ये नोंदणीकृत असलेल्या 12 खाजगी रुग्णालये / सेंटर याठिकाणी ज्या रुग्णालयात शासकीय निकषानुसार जागा, लस साठवणुकीची सोय, लस देण्याकरिता आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ असल्यास याठिकाणी कोव्हीड 19 लसीकरण सेंटर निश्चित करण्यात येऊन टप्पयाटप्प्याने या रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.लसीकरणासाठी 60 वर्षावरील नागरिकांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, कार्यालयीन, निवडणूक ओळखपत्र इत्यादी वयाबाबतच्या योग्य पुराव्याची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सहव्याधी (को - मॉर्बेडिटी) असणा-या नागरिकांनी वयाच्या पुराव्यासोबतच वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिकाकडून विहीत नमुन्यात प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्राठिकाणी दाखविणे आवश्यक आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक डोस मोफत देण्यात येईल. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये, सीव्हीसी नोंदणीकृत रुग्णालये याठिकाणी लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी प्रति लाभार्थी रुपये 250/- प्रति डोस शुल्क आकारण्यात येईल.लाभार्थ्याने पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवस ते 42 दिवस या अंतराने दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे. 42 दिवसांनंतर पोर्टलमार्फत दुसरा डोस घेता येत नाही याची नागरिकांनी नोंद घ्यावयाची आहे.सद्यस्थितीत नोंदणी झालेले व पहिल्या डोससाठी प्रलंबित असलेले आरोग्यकर्मी (हेल्थ केअर वर्कर), पोलीस सुरक्षा अशा पहिल्या फळीतील कोव्हीड योध्दे (फ्रंटलाईन वर्कर), नोंदणी झालेले व दुस-या डोससाठी प्रलंबित असलेले हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर, नोंदणी न झालेले हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर, तसेच तिस-या टप्प्यातील 60 वर्षापेक्षा अधिक वयाचे नागरिक आणि 45 ते 59 वर्ष वयातील सहव्याधी असणारे (को - मॉर्बेडिटी) नागरिक यांचे लसीकरण सुरु आहे.


Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image