मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करणा-या 25 जणांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई - कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत 'ब्रेक द चेन' अंतर्गत विविध प्रतिबंध जाहीर करण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्यावर पोलीस विभागाच्या सहकार्याने लक्ष ठेवले जात आहे. यामध्ये संचारबंदी लागू असूनही काही नागरिक मॉर्निग वॉक अथवा इव्हिनींग वॉकसाठी घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.वास्तविकत: ब्रेक द चेन आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली असून जीवनावश्यक बाबींव्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडणे अपेक्षित नाही. तथापि तरीही काही बेजबाबदार नागरिक या निर्बंधांचे उल्लंघन करताना आढळत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 

                         नेरूळ वंडर्स पार्क परिसरात मॉर्निग वॉकच्या बहाण्याने घराबाहेर पडून कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणा-या ३ व्यक्तींवर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच ऐरोली सेक्टर १४ येथेही २२ नागरिकांवर कारवाई करण्यात आलेली आहे.यापुढील काळात मॉर्निंग वॉक, इव्हिनींग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडून संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याप्रमाणेच त्यांची तिथेच रॅपीड अँटिजेन टेस्ट करून रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना महानगरपालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला असून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व विभाग कार्यालयांचे सहा. आयुक्त यांना दिलेले आहेत.त्यामुळे यापुढे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मॉर्निंग- इव्हिनींग वॉकच्या सर्व ठिकाणांवर नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीसांची करडी नजर असणार असून कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणा-या बेजबाबदार नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याप्रमाणेच त्यांची कोव्हीड टेस्टही केली जाणार आहे.  

Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी - आयुक्त
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित
Image