तीन करोड साठी अपहरण करणाऱ्या वकिलाला अटक, हत्या करण्याचा होता डाव

नवी मुंबई - तीन करोड रुपयांसाठी शिपिंग कंपनीच्या मालकाचे अपहरण करून त्याला नाशिक येथे डांबून ठेवणाऱ्या वकिलाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अजून त्याच्या तीन साथीदारांचा शोध घेत आहेत.विमल झा असे अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव असून त्याने यापूर्वी अपहरण केलेल्या शिपिग कंपनीच्या मालकाला एका गुन्ह्यात जामीन मिळवुन दिला होता.वेळीच शिपिंग कंपनीच्या मालकाने नजर चुकवून बीग बझार मधील कामगाराच्या मोबाईल वरून पत्नीस कॉल केल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

                   नवनाथ नारायण गोळे (३२) असे शिपिंग कंपनीच्या मालकाचे नाव असून ते खारघर मध्ये राहणार आहेत.सन २०२० मध्ये त्यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर अहमदनगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्या गुन्ह्यात जामीन मिळावा म्हणून त्यांच्या पत्नीने वकील विमल झा यांची भेट घेतली व पतीचा जामीन मिळवुन घेतला.त्यावेळी विमल झा यांनी गोळे याना जामीन मिळवुन देण्यासाठी त्यांच्या पत्नीकडून ७० लाख रुपये घेतले.ज्या वादात गोळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्या वादाचा सहारा घेऊन झा यांनी गोळे यांच्याकडून तीन करोड रुपयांची मागणी केली.ते दिले नाहीतर पुन्हा खोट्या गुन्ह्यात अडकवीन अशी धमकीही झा यांनी दिली.ती रक्कम देण्यास गोळे यांनी नकार दिला असता त्यांनी २ एप्रिल रोजी त्यांच्या बेलापूर येथील कार्यालयात रात्री ९ च्या सुमारास भेटण्यासाठी बोलावले.त्यावेळी झा व त्याचे तीन सहकारी त्याठिकाणी उपस्थित होते.त्यावेळी त्यांनी पुन्हा गोळे यांच्याकडे तीन करोड व संपूर्ण संपत्ती त्यांच्या नावावर करण्याची विनंती केली.त्याच पुन्हा गोळे यांनी नकार दिल्याने अखेर झा व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना गाडीत डांबून नाशिक मधील फार्महाउस वर नेले.त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधत 3 वेगवेगळ्या अज्ञात ठिकाणी नेत मारहाण करण्यात आली.पहिल्यांदा कर्जत नंतर कल्याण रोड मार्गे मुरबाड आणि त्यानंतर माळशेज घाट गाठत आळे फाटा मार्गे नाशिक ला एका फार्म हाऊसवर बंद खोलीत ठेवले होते.वारंवार पैश्यांचा तगादा लावत डोक्यात जबर मारहाण करण्यात आली. तसेच पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. जो पर्यंत पैसे देत नाही तो पर्यंत 3 ते 4 दिवस एकाच ठिकाणी डांबन्याचा प्लॅन होता.त्यानंतर तिघे जण दुपारच्या सुमारास जेवणासाठी गेले असता गोळे यांनी तिघांची नजर चुकवत बीग बझार मधील एका कामगाराच्या मोबाईल वरून पत्नीस कॉल केला.व घडलेला प्रकार सांगितला.त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी गोळे यांचा शोध घेत अखेर त्यांची सुटका केली.त्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेऊन विमल झा व त्यांच्या सहकाऱ्यांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत विमल झा याला सोमवारी अटक केली.बाकी फरार अजून त्यांच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.


आरोपी वकील विमल झा याच्यासह गुन्ह्यात असलेले चार साथीदार फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहे. नवी मुंबईतून अपहरण करताना आरोपी सह 3 साथीदार होते आणि त्या नंतर नाशकात आणखी साथीदार सामील झाला. फिर्यादीला पैसे घेऊन ठार करण्याच्या बेतात हे सारे जण होते असे समोर आले आहे.


Popular posts
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची अधिकृत स्थापना , गुढीपाडव्याचे औचित्य साधून नव्या महाराष्ट्र कार्यकारिणीची होणार घोषणा
Image