ग्राहकांनी त्यांचे थकीत वीज देयकाचा भरणा करावा - महावितरण, मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर ग्राहकांनी त्यांची वीज देयके भरली नाहीत

नवी मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात थैमान घातल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. सध्या अत्यआवश्यक सेवा वगळून सर्वांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण संस्था ऑनलाईन शिकवणी करत आहेत. दुसरीकडे, रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक   श्री. विजय सिंघल यांनी सर्व परिमंडल कार्यालयांना अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे, महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना नियमावलीचे पालन करुन ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ग्राहकांनी त्यांचे थकीत वीज देयकाचा भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

                   महावितरण कंपनी सुद्धा एक ग्राहक असून महिन्याच्या अखेरीस विविध वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना वीज खरेदीसाठी लागणारी रक्कम भरावी लागते. सध्या उन्हाचा पारा वाढला असून जवळ-जवळ २९ हजार मेगावॉट पर्यंत विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. जर ग्राहकांनी वेळेत वीजबिले न भरल्यास वीजखरेदी मध्ये अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना २४ X ७  वीजपुरवठा उपलब्ध करण्यासाठी महावितरणचे वीजबिल इतर बिलाप्रमाणे म्हणजेच टीव्ही रिचार्ज, मोबाईल बिल सारखे प्राधान्याने भरावे असे आवाहन महावितरणच्या भांडूप परिमंडलतर्फे करण्यात आले.सगळीकडे कोरोनामुळे एवढी बिकट परिस्थिती असून आपले जीव धोक्यात टाकून वीज कर्मचारी दिवस रात्र काम करीत आहेत.रुग्णालयाच्या वीजपुरवठ्याला प्राधान्य देऊन घरघुती तसेच सर्व क्षेत्रामध्ये अखंडित वीजपुरवठा करणे आवश्यक असून वीज अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत.मार्च २०२० पासून नियमित काम करीत असलेल्या वीज अधिकारी व कर्मचारी सुद्धा या संसर्गाने बाधित होत आहेत.तरी ग्राहक सेवेला सर्वोतपरी समजून काम करीत आहेत.मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर ग्राहकांनी त्यांची वीज देयके भरली नाहीत.परिणामतः महावितरणची थकबाकी खूप वाढली होती. महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून नाईलाजाने फेब्रुवारी व मार्च २०२१ मध्ये थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.त्यानंतर, अनेक ग्राहकांनी आपले थकीत वीजदेयक भरले पण आज ही कित्येक ग्राहकांनी आपली देयके भरली नाही.महावितरण भांडूप परिमंडलात उच्चदाब व लघुदाब घरगुती ग्राहकांचे रु.१८०.२९ कोटी थकीत आहे.व्यवसायिक ग्राहकांचे रु.१४०.९४ कोटी, औद्योगिक ग्राहकांचे रु. १५०.८५ तर इतर वर्गवारीतील ग्राहकांचे रु.१८.३ कोटी पाणीपुरवठा योजनांचे रु.७.६६ कोटी थकबाकी आहे. याशिवाय स्ट्रीट लाईट रु.१९१.५७ कोटी तर कृषी ग्राहकांचे रु.४.३९ कोटी  असे एकूण  रु.६९३.९९ कोटी थकबाकी आहेत.महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री.सुरेश गणेशकर म्हणाले की, "कोरोनाच्या काळात चांगली वीजसेवा व अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, २४ X ७ काम करीत आहेत. यामध्ये, अनेकांना कोरोनाच्या संसर्गाची लागण झाली असून कित्येक अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना मृत पावले आहेत. ग्राहकांना अविरत व उत्तम सेवा देणाऱ्या या कोरोना योद्धांना वीज देयक भरून सहकार्य करावे.    

Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image