18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लस घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार https://selfregistration.cowin.gov.in या कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी करणे अनिवार्य आहे. केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण केले जात आहे यांची विशेष नोंद घ्यावयाची आहे. ही नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर आपल्या सोयीचे लसीकरण केंद्र निवडून त्याठिकाणी दिनांक निवडून आपली अपॉईंटमेंट आरक्षीत करावयाची आहे. आणि त्या वेळेला, त्या केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे. सदर नोंदणी व अपॉईंमेंट बुकींग प्रक्रिया पूर्ण करूनच लसीकरण केंद्रावर जायचे असून लसीकरणासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करून आलेल्या कोणत्याही व्यक्तींची गैरसोय होणार नाही याची काळजी महानगरपालकेमार्फत घेतली जात असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकऱणास शनिवार 1 मे, 2021 पासून सुरुवात होत आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील नवी मुंबईकर नागरिकांसाठी मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय सेक्टर 15 नेरूळ येथे पहिल्या मजल्यावर विेशेष बूथ सुरु करण्यात येत असून याठिकाणी दुपारी 1 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे.अभिजीत बांगर यांनी वेबसंवादाव्दारे सर्व वैद्यकीय अधिका-यांची विशेष बैठक घेऊन लसीकरणाच्या सुयोग्य नियोजनाविषयी सविस्तर चर्चा केली होती. त्या अनुषंगाने शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानुसार महानगरपालिकेने 18 ते 44 वयोगटासाठी विशेष बूथ कार्यान्वित करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.शासन निर्देशानुसार केवळ रुग्णालये, आरोग्य केंद्रे अशा स्वरुपातील आरोग्य संस्थांमध्येच आवश्यक जागा, मनुष्यबळ व इतर अनुषांगिक बाबींची पूर्तता होत असल्यास लसीकरण केंद्रे स्थापन करावयाची आहेत. त्यामुळे 18 वर्षावरील नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यादृष्टीने लसीकरण केंद्रात वाढ करण्यासाठी जास्तीत जास्त आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण केंद्रे निर्माण करण्याबाबत वैद्यकीय अधिका-यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याचे आयुक्तांनी सूचित केले होते. अशा 38 रुग्णालयांकडून लसीकरण केंद्र स्थापित करणेबाबत अर्ज प्राप्त झाले असून तेथे केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक बाबींची तपासणी आरोग्य विभागामार्फत केली जात आहे.सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, ऐरोली व नेरुळ अशी 3 रुग्णालये, तुर्भे माता बाल रूग्णालय, 23 नागरी आरोग्य केंद्रे व इ एस आय एस रुग्णालय वाशी येथील जंबो सेंटर अशा महानगरपालिकेच्या एकूण 28 केंद्रांवर आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे, ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्ष वयावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
कामगार दिनानिमित्त 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या कोव्हीड लसीकरणास प्रारंभ
नवी मुंबई - केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक मे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकऱणास नेरूळ येथील मॉँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात प्रारंभ झाला असून अश्विन थोन्टाकुडी या 28 वर्षीय नागरिकाला 18 ते 44 वर्ष वयोगटातील लसीकरणाचा पहिला मान मिळाला.1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य असल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांमध्ये कोव्हीड लस घेण्याविषयी अतीव उत्सुकता होती.या वयोगटासाठी निश्चित केलेल्या ठाणे जिल्ह्यातील 5 केंद्रामध्ये सेक्टर 15 नेरूळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयाचा समावेश असून केंद्र सरकारच्या कोविन पोर्टलवर रितसर नोंदणी केल्यानंतर व त्यावर केंद्र निवडून अपॉईंटमेंट आरक्षित केल्यानंतरच लसीकरण केले जात आहे. रात्री उशीराने सदर पोर्टलवर अपॉईंटमेंट बुकींग लिंक प्रदर्शित झाल्यावर 15 मिनिटातच पहिल्या दिवसाच्या 200 लाभार्थ्यांनी आजच्या दिवसाची अपॉईंटमेंट आरक्षित केली. या लाभार्थ्यांचे लसीकरण रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापित बूथमध्ये कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करून दुपारी 1 वाजता सुरू करण्यात आले.