कोरोना कर्तव्यावर असलेल्या दिवंगत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना महापालिकेकडून 25 लक्ष रक्कमेचे सानुग्रह अनुदान

नवी मुंबई - कोव्हीडच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासह इतरही विभागातील अधिकारी, कर्मचारी झोकून देऊन काम करीत असून कोरोनाबाधित कर्मचा-यांचा उपचार कालावधी सेवा कालावधी म्हणून ग्राह्य धरणे, कोरोना कालावधीतील कामासाठी विशेष भत्ता देणे, कोरोना कर्तव्यावर असलेल्या दिवंगत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना महापालिकेकडून 25 लक्ष रक्कमेचे सानुग्रह अनुदान देणे असे अनेक कर्मचारीहिताय निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतले आहेत.यामध्ये आता आणखी दोन महत्वाच्या निर्णयांची भर पडलेली असून महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचे असलेले व अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी होत असूनही प्रलंबित असलेले पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजना लागू करणे हे दोन्ही निर्णय आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतलेले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी आदेश पारीत करण्याचे निर्देश प्रशासन विभागास दिलेले आहेत.                                                        नुकतीच महानगरपालिकेची सेवाप्रवेश नियमावली मंजूर झालेली असून त्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचारी यांची पदोन्नती व आश्वासित प्रगती योजना लागू करणेबाबत आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. यावेळी या दोन्ही विषयांबाबतचे तांत्रिक मुद्दे, निकष याविषयी सविस्तर चर्चा करून मार्ग कसा काढता येईल हे निश्चित करण्यात आले.चर्चेअंती प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांना याबाबतचे प्रस्ताव लवकरात लवकर निर्गमित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यामध्ये वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचा-यांच्या सर्व संवर्गास प्रथम प्राधान्य देण्याचे आयुक्तांनी प्रामुख्याने सूचित केले.7 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यास शासन मंजूरी प्राप्त झालेली असून त्याची अंमलबजावणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये करण्यास आयुक्तांची मंजूरी प्राप्त झालेली आहे. याचा फायदा 54 संवर्गातील 550 हून अधिक महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना होणार असून आयुक्तांनी शासन निर्णय येताच घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे महापालिकेच्या पदोन्नतीपासून रखडलेल्या कर्मचा-यांचा मार्ग मोकळा होणार आहे.अशाच प्रकारे सातव्या वेतन आयोगाच्या 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीसही आयुक्तांनी मान्यता दिलेली असून सहाव्या वेतन आयोगानुसार 12 व 24 व्या वर्षी मिळणारे आश्वासित प्रगती योजनेचे 2 लाभ आता सातव्या वेतन आयोगानुसार 10व्या, 20व्या व 30व्या वर्षी असे 3 लाभांच्या स्वरूपात मिळणार आहेत. आपल्या सेवा कालावधीत पदोन्नतीची संधी न मिळाल्याने येणारी कुंठीतता घालविण्यासाठी आश्वासित प्रगती योजनेनुसार 12 वर्षांनी मिळणारी पदोन्नतीच्या लाभाची पहिली संधी आता 10 च वर्षांनी मिळणार असून पुढेही दुसरा लाभ 24 ऐवजी 20 वर्षांनी मिळणार आहे तसेच 30 व्या वर्षीचा तिसरा लाभही नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. याचा फायदा 60 टक्के महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना होणार आहे.पदोन्नतीविषयी तसेच सातव्या वेतन आयोगानुसार 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणेविषयी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतलेल्या या कर्मचारी कल्याणकारी दोन्ही निर्णयांचे महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून स्वागत करण्यात येत असून यामुळे अधिकारी, कर्मचारी अधिक जोमाने काम करतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. 

Popular posts
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून नेरुळ विभाग अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांविरुध्द कारवाई,दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल सामान जप्त, झोपडी धारकांना स्थानिक पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून हटवण्यात यश , नेरुळ विभाग अतिक्रमण विभागाच्या बेधडक कारवाईची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज ?
Image
<no title>
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image