नवी मुंबई - लॉक डाऊनच्या कालावधीत गोरगरीब,गरजवंतांची खाण्या पिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेना उपनेते , प्रदूषण समाघात प्राधिकरण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा पुन्हा एकदा धावून आले आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या तुम्ही खबरदारी घ्या ,आम्ही जबाबदारी घेतो या टॅग लाईन प्रमाणे बेलापुर विधान सभा क्षेत्राची जबाबदारी विजय नाहटा यांनी घेतली असून आज महाराष्ट व कामगार दिनाचे औचित्य साधून तुर्भे नाका शिवसेना शाखा व इंदिरानगर शाखा येथे गोरगरीब गरजू नागरिकांना खाद्य पदार्थ वस्तूंच्या किटचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले.विजय नाहटा यांच्या प्रमुख पुढाकाराने बेलापुर विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ आज तुर्भे येथे करण्यात आला. या किटमध्ये आवश्यक असणाऱ्या तेल,साखर,तूरडाळ,साबणा,पोहे,चणा,मूगडाळ,चहा पावडर,मिरची पूड, मीठ, हळद, इत्यादी समुग्रीचा समावेश करण्यात आला आहे.तुर्भे नाका आणि इंदिरा नगर येथे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील,मिलिंद सूर्यराव, शहर प्रमुख विजय माने,उपशहर प्रमुख प्रदीप बी.वाघमारे,उत्तर भारतिय जिल्हा संघटक कमलेश वर्मा,महिला उप संघटक शांताबाई कदम यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.यावेळी तुर्भे विभाग महेश कोटीवाले,तय्यब पटेल इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी शेकडो गरजू नागरिकांनी अण्णा पदार्थाच्या किटचा लाभ घेऊन नवी मुंबई शिवसेना,विजय नाहटा फाउंडेशनचे संस्थापक / अध्यक्ष विजय नाहटा यांना धन्यवाद दिले.
शिवसेनाच्या वतीने गोरगरीब,गरजवंतांना अन्न पदार्थांच्या किटचे वाटप