शिवसेना शाखाप्रमुखाची वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी


नवी मुंबई - शिवसेनेच्या उमेद्वारांविरोधात उभ्या राहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला शिवसेना शाखा प्रमुखाने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार तुर्भे विभागात उघडकीस आला आहे.या प्रकरणी त्या शाखा प्रमुखावर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.जर त्याला तत्काळ अटक करण्यात न आल्यास संरक्षणार्थ आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने दिला आहे.त्यामुळे ऐन कोविड महामारी काळात राजकीय वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

                      भरत कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तुर्भे मधील शिवसेना शाखाप्रमुखाचे नाव असून ते शिवसेना नेते सुरेश कुलकर्णी यांचे खंदे समर्थक आहेत.सुरेश कुलकर्णी तुर्भे मधील माजी नगरसेवक असून ते शिवसेना नेतेही आहेत.त्यांच्या मतदार संघातच वंचित बहुजन आघाडीचे शंकर पडुळकरही उमेदवार असून तेही निवडणूक रिंगणात आहेत.नवी मुंबई मनपाच्या निवडणूका केव्हाही होऊ शकत असल्याने प्रत्येक उमेदवार आपल्या परीने काम करत आहे.याचा फटका आपल्या नेत्याला बसू नये म्हणून कार्यकर्ते काही ठिकाणी आक्रमक झालेले दिसून येतात.असाच प्रकार तुर्भेत समोर आला आहे.वंचितचे शंकर पडुळकर काही कामानिमित्त प्रभागात आले असता त्यांना कांबळे समोरून भेटले तर थेट अंगावरच धावून गेले.त्यावेळी शंकर पडुळकर सावरले असता त्यांनी थोडी माघार घेतली.मात्र रागाच्या भरात असलेल्या कांबळे यांनी शंकर पडुळकर यांना शिवीगाळ करत आमच्या सुरेश कुलकर्णीच्या विरोधात जातो का ?,आमच्या भाईच्या विरोधात काम करतो काय ?,तुला जीवे ठार मारीन तसेच तुझे राहणे ,हागणे, मुतणे बंद करीन असे धमकावत तू ज्या पक्षाचे काम करतो त्या पक्षाचे काम बंद कर नाहीतर तुला भारी पडेल असे बोलत अंगावर पुन्हा धाव घेतली.तर कांबळे यांनी त्याच वेळेस शंकर पडुळकर याना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.यावर शंकर पडुळकर यांनी कांबळे यांच्याविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनीही गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली.याचा त्रास भविष्यात होऊ शकतो याची चाहूल लागल्याने अखेर शंकर पडुळकर यांनी घडलेला प्रकार पक्षाच्या नेत्यांना सांगितला.त्यावेळी वरिष्ठ पातळीवर नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याबरोबर या विषयावर चर्चा झाल्यानंतर अखेर कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र त्यांना अटक करण्यात न आल्याने पोलीस त्याला अभय देत असल्याचा संशय शंकर पडुळकर यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे संरक्षणार्थ तत्काळ भरत कांबळे याना अटक झाली नाही तर आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा शंकर पडुळकर यांनी दिला आहे.

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image