नवी मुंबई अपोलो तर्फे कोरोना लसीकरण सुरु , अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षे व त्यापुढील वयोगटासाठी लसीकरण केले जाईल

नवी मुंबई :- अपोलो हॉस्पिटल्सने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पुढाकार घेत थेट लस उत्पादकांकडून लशी मिळवण्याची व्यवस्था केली आहे.यामध्ये सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने आज जाहीर केले आहे की त्यांनी ३ मे २०२१ पासून १८ वर्षे व त्यापुढील वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरणास सुरुवात केली आहे.

              अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे सीओओ आणि युनिट हेड संतोष मराठे यांनी सांगितले, "सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांच्या लसीकरणाला मान्यता दिल्यानंतर कोविड-१९ लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात कोविड लसीकरण सुरु करणाऱ्या, देशातील पहिल्या खाजगी रुग्णालयांपैकी अपोलो हॉस्पिटल्स एक आहे. नवी मुंबईमध्ये आम्ही कोविशील्ड ही लस देत आहोत ज्याची किंमत ८५० रुपये आहे आणि सरकारी नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व पात्र व्यक्तींना लस दिली जात आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जाईल अशी केंद्रे निर्माण करण्यासाठी आणि ती सुरळीतपणे चालवता यावीत यासाठी आम्ही सक्षम संसाधने, शीत शृंखला व्यवस्थांमध्ये गुंतवणूक केली आहे तसेच विविध संसाधने तैनात केली आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांच्या परिसरातील तसेच हौसिंग सोसायट्यांमधील लसीकरण अभियानांबरोबरीनेच खारघर (सरस्वती इंजिनियरिंग कॉलेज) आणि वाशी (मॉडर्न स्कूल) येथे २ कम्युनिटी व्हॅक्सिनेशन्स सेंटर्स उभारण्यासाठी आम्हाला सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून अनुमती मिळाली आहे. ३ मेपासून आम्ही दररोज जवळपास १००० व्यक्तींना लस देत आहोत. आमच्या सर्व सुसज्ज संसाधनांसह आमचे तज्ञ व वैद्यकीय कर्मचारी हा उपक्रम असाच पुढे सुरु ठेवण्यासाठी सज्ज आहेत. अतिशय महत्त्वाच्या अशा या उपक्रमाचा प्रसार करत असतानाच सर्व नियम व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यावर देखील आम्ही भर देत आहोत." नवी मुंबई महानगरपालिकेचे माननीय आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले,"संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तरुण व्यक्ती मोठ्या संख्येने आजारी पडत असल्याचे दिसून येत आहे आणि १८ वर्षांपेक्षा पुढील वयाच्या प्रत्येकाला लस दिली गेल्याने केसेसच्या संख्येत सातत्याने होत असलेली वाढ रोखण्यात मदत होईल.मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियानाला पाठिंबा देण्यासाठी सर्व पात्र व्यक्तींना लस उपलब्ध करवून देण्याच्या प्रयत्नांना आम्ही साथ देत राहू. कोविड-१९ लसीकरणामध्ये योगदान देण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांना लस उपलब्ध करवून देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सकडून राबवल्या जात असलेल्या उपक्रमांबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.पनवेल महापालिकेचे माननीय आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले, "दुसरी लाट अति भयंकर आहे.  प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण पूर्ण होणे अतिशय गरजेचे आहे. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्ती कोविड-१९ लसीकरणासाठी पात्र ठरवण्यात आल्यामुळे लसींची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्याच्या परिस्थितीत आम्ही मोठ्या प्रमाणावर कोविड-१९ लसीकरणासाठी आणि प्रत्येक व्यक्तीला लस उपलब्ध करवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहोत. आम्हाला पक्की खात्री आहे की, पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी आणि खासकरून घरे व कामाच्या ठिकाणी जवळपास जितक्या जास्त लसीकरण मोहिमा चालवल्या जातील तितके लोकांसाठी लस घेणे सोपे बनेल.

Popular posts
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image