महिला कामगारांना मी स्वतःच्या हस्ते कामगार संघटनेचे ओळखपत्र वितरीत करीन - खासदार सुप्रियाताई सुळें

नवी मुंबई - खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत असतांनाच विविध सुविधांपासूनही वंचित रहावे लागत आहे.त्यांनाही योग्य त्या स्तरावर न्याय मिळायला हवा, त्यांनाही मान सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली असून बहुतांश महिलांनी या संघटनेत येण्यासाठी पुढाकार घेतला आहे.त्यांना लवकरच संघटनेचे ओळखपत्र वितरित करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षा राजेश्रीताई येवले यांनी खासदार सुप्रियाताई सुळें याना सांगितले असता त्यांनी महिला कामगारांना मी स्वतःच्या हस्ते कामगार संघटनेचे ओळखपत्र वितरीत करीन,आपण मला अशा कार्यक्रमांना नवी मुंबईमध्ये आवश्य आमंत्रित करा मी नक्की येईन असे आश्वासन दिले आहे.

                 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षा राजेश्रीताई येवले आणि ग्रंथालय बेलापूर विधानसभा अध्यक्ष सचिनभाऊ साळवे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर या पार्टीच्या मुख्यालयात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळेंची सदिच्छा भेट घेतली.या भेटीमध्ये नवी मुंबईत होऊ घातलेल्या आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात साधक-बाधक चर्चाही करण्यात आली.तसेच राजेश्री येवले यांनी गेल्या आठवड्यात,"धिरज पब्लिक रिटेबल ट्रस्ट"च्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या सानपाड्यातील प्रभाग क्र ७६ मध्ये वास्तव्यास असणाऱ्या ३०० महिलांना सामाजिक बांधिलकी जपत अन्न-धान्याच्या केलेल्या वाटपाचे खास कौतुक केले.त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये आपण असे सामाजिक उपक्रम सतत राबवा,पक्ष आपणांसोबत आहे.असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.त्याचवेळी महिला कामगारांप्रती येवले यांच्याकडून होणारी तळमळ पाहता सुप्रियाताई सुळें यांनी कोरोनाचे हे संकट संपल्यानंतर सर्व महिला कामगारांना मी स्वतःच्या हस्ते कामगार संघटनेचे ओळखपत्र वितरीत करीन,आपण मला अशा कार्यक्रमांना नवी मुंबई मध्ये आवश्य आमंत्रित करा मी नक्की येईन असे आश्वासन यावेळी राजेश्री येवले यांना दिले आहे.


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू