मुंबई - सध्या कोरोनामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्याने बॅक स्टेज कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे लक्षात घेऊन अरविंदो मीरा संस्थेच्यावतीने दादर टी टी या ठिकाणी अभिनेत्री नयन पवार यांनी कलाकारांना धान्य वाटप केले.लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य गरीब, मजूर, तसेच बॅक स्टेज कलाकारांची उपासमार होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नयन पवार यांनी वडाळा येथील पाच उद्यान या ठिकाणी अनेक कलाकारांना धान्याचे वाटप केले होते. त्यानंतर दादर मध्ये राहणाऱ्या कलाकारांनी ही मदत मागितली होती. त्यानुसार अरविंदो मीरा संस्था तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर, यांच्यावतीने बॅक स्टेज कलाकारांना अभिनेत्री नयन पवार यांनी धान्याचे वाटप केले. दादर टी टी या ठिकाणी हा वाटपाचा कार्यक्रम झाला.यावेळी अरविंदो मीरा संस्थेच्या सचिव मानसी राऊत, समाजसेवक रत्नाकर खानविलकर,यांची विशेष उपस्थिती होती.
दादर मध्ये ही कलाकारांना धान्य वाटप, चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांचा पुढाकार