शिवसेनेच्या वतीने सानपाडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
• Yogesh dnyneshwar mahajan
नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी सानपाडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेना नवी मुंबई आणि लोकमत समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे शिवसेना उपनेते,पर्यावरण समाघात प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय नाहटा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी नवी मुंबई महानगर पालिका माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले,जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर,महिला संघटक रंजनताई शिंत्रे,लोकमतचे संपादक विनायक पातरुडकर,उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव, प्रकाश पाटील,दिलीप घोडेकर,संतोष घोसाळकर,शहर प्रमुख ,विजय माने,प्रवीण म्हात्रे उपस्थित होते. रक्तदान शिबीराला नवी मुंबईतील विविध भागातील शेकडो नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून शेकडो रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीरात महिला आणि युवकांसह पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.नवी मुंबई ब्लड बँक आणि नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्त बाटल्यांचे संकलन केले. यावेळी शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढविले आणि शिवसेना कार्यकर्त्यांना कौतुक केले.
