पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल,


पत्नीचा मानसिक व शारिरिक छळ करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

नवी मुंबई - लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच विवाहित जोडप्यात अंतर्गत वादाला सुरवात झाल्याने त्याचा फटका पत्नीला बसला.पती, सासू ,सासरे व दीर यांच्याकडून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ होऊ लागल्याने अखेर या प्रकरणी चौघांवर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचवेळी पाच ते सहा महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नीला गर्भपात करण्यासाठीही दबाव टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.

                  सुदर्शन दत्तात्रय जाधव ,पती (२५) दत्तात्रय गणपत जाधव,सासरे (४९) कांताबाई दत्तात्रय जाधव ,सासू (४५) व अभिषेख दत्तात्रय जाधव,दीर (२२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.हे चौघेही पुणे शिरूर मधील राहणार असून तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात सदरील गुन्हा वर्ग करण्यात येणार असल्याचे सानपाडा पोलिसांनी सांगितले.सुदर्शनचे सन २०२० मध्ये प्रेमप्रकरणातून लग्न झाले.पुण्याच्या राहणाऱ्या मुलाचे मुंबईत राहणाऱ्या मुलीबरोबर लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच त्यांचे खटके उडायला सुरवात झाली.याच दरम्यान तिला गर्भधारणा झाली तर पतीचे कामही सुटले.त्यामुळे त्रस्त झालेल्या पतीने पत्नीला गावी जाऊन राहूया अशी मागणी केली.त्यास नकार मिळाल्याने अखेर तिचा सर्वांकडून छळ सुरु झाला.तर पतीने पत्नीवर गर्भपात करण्यास दबाव टाकायला सुरवात केली.या सर्व छळाला वैतागून अखेर पीडित पत्नीने वरील चौघांवर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

===≠==================================

अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई - जमीन खरेदी विक्रीचे काम करणाऱ्या इसमाने त्याच्याकडे कामाला असलेल्या महिलेबरोबर अनैतिक संबंध जोडून अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी रबाळे एमआयडीसीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस तपास करत असून याच दरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली असल्याचे समोर आले आहे.

                  हार्ट्स सुनील दास असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो कल्याण मधील राहणार आहे.तर पीडित महिला चेंबूर माहुल गावात राहणारी आहे.दासने पीडित महिलेबरोबर ओएलक्सद्वारे ओळख वाढवत मी मोठ्या लोकांचे जमीन खरेदी विक्रीचे काम करतो असे सांगितले.व त्याच वेळी तू माझी असिस्टंट म्हणून काम कर अशी ऑफरही दिली.काम चांगले मिळत असल्याचे विचार करत पीडित महिलेने दास कडे काम करण्याचा निर्णय घेतला.काम करत असतांनाच दासने महिलेशी जास्त जवळीक साधत तिच्या मनाविरुद्द शारीरिक संबंध तयार केले.या दरम्यान ती गर्भवती राहिले असल्याचे समजताच त्याने महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.तर अनैतिक संबंधाचा व्हिडीओही तयार केला.व घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तो व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही दिली.यावर त्रस्त झालेल्या पीडित महिलेने अखेर या प्रकरणी दास वर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

===≠==================================

लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

नवी मुंबई -  लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अनैतिक संबंध ठेऊन मुलं न होऊ देण्यासाठी औषध देणाऱ्या इसमावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल करणारा इसम हरियाणा मधील रोहतक मध्ये राहणार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

                   हरिशकुमार महिंदर पाल असे गुन्हा दाखल करण्यात इसमाचे नाव आहे.पीडित महिला सन २०१४ मध्ये कामानिमित्त नवी मुंबईत आल्या असत्या त्यांची ओळख हरिशकुमार बरोबर झाली.त्यावेळी ओळखीचे रूपांतर दोघांमध्ये प्रेमात झाले असता हरिशकुमार याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले.व एकत्र राहण्यास सुरवात केली.त्यावेळी वाशी सेक्टर २९ परिसरातील पेइंग गेस्ट मध्ये राहत तर गुरगाव हरियाणा पानिपत या ठिकाणी राहत त्याने पीडित महिलेबरोबर अनैतिक संबंध ठेवले.या संबंधातून पीडित महिला गर्भवती राहू नये म्हणून हरिशंकर याने मारहाण करत औषध दिले.हरिशंकर आपल्याला लग्नाचे आमिष दाखवुन फक्त त्याचा स्वार्थ साधत असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

===≠==================================

मोबाईल सिमकार्ड केवायसी करण्याची नावाखाली लाखो रुपयांचा गंडा

नवी मुंबई -  मोबाईल सिमकार्ड केवायसी करण्याची नावाखाली लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नेरूळमध्ये उघडकीस आला आहे.या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या भामट्याचा शोध घेत आहेत.

                 सीवुड येथे राहणाऱ्या राजीव सिन्हा यांना शनिवारी ते घरी असतांना त्यांच्या मोबाईलवर दीपक नामक व्यक्तीचा मॅसेज आला.त्यात त्याने व्होडाफोनचे सिमकार्ड केवायसी करण्यासाठी ऑनलाईन वीआई व टीम विवर  क्विक सर्व्हिस हे ऍप डाउनलोड करण्यास सांगितले.त्याचवेळी सिन्हा हे वीआई व टीम विवर  क्विक सर्व्हिस हे ऍप डाउनलोड करून काम करत असतांना दीपक नामक व्यक्तीने त्यांना बोलण्यात गुंतवले.व त्यांचे सर्व संदेश वाचत त्यांच्या आयसीआयय बँकेतून त्यांच्या संमतीशिवाय ऑनलाईन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एकूण १,३२,५०८ /- रु पाठऊन सिन्हा यांची फसवणूक केली.सदर बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दीपक नावाच्या इसमावर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


Popular posts
सिडकोच्या इमारत पुनर्बांधणी धोरणामध्ये महत्वपूर्ण बदल, १०० % ऐवजी केवळ ५१% सभासदांच्या संमतीने करता येणार इमारतींचा पुनर्बांधणी
Image
पोलीस असल्याचे सांगून बलात्कार करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक
Image
८६ हजार वीज कर्मचारी,अभिंयते,अधिकारी व ४२००० कंत्राटी कामगार यांचा अदानी या खाजगी भांडवलदारांच्या विरोधात संपाची हाक , महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीतर्फे संपाची हाक.
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
१६ वी रायन झोनल ऍथलेटिक मीट २०२३ पार , तरुण यशवंतांचा सत्कार करण्यासाठी विस्तृत पारितोषिक वितरण समारंभ आयोजित
Image