एलआयसी एजंटचा कर्जाला कंटाळून खाडी पुलावरुन आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई : मी मेलो तर माझ्या मुलाची कर्जातून मुक्तता होईल,त्यांना पॉलीसीचे पैसे मिळतील या विचारातून कर्जाला कंटाळलेल्या इसमाने शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास वाशी खाडी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अधिकाऱ्यांनी वेळीच मदत केल्याने त्या व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत कोळी बांधवांच्या मदतीने या व्यक्तीचे प्राण वाचवले. सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

                  शेषनाथ दिवेदी (५६) असे त्या इसमाचे नाव असून तो नेरुळ विभागात राहणार आहे.एलआयसी एजंटचे काम करणारा दिवेदी गेल्या अनेक दिवसांपासून कर्जाला कंटाळला होता.तो एलआयसीचे काम करत असल्याने त्याला पॉलिसीची जाणीव होती.या विचाराने त्याने शुक्रवारी सकाळी आत्महत्या करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.सकाळी तो १०.३० च्या सुमारास वाशी खाडी पुलावर गेला असता त्याने त्या ठिकाणाहून उडी मारहती आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी वाहतूक पोलिस शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पाहिले.त्याचवेळी तातडीने हालचाली करत त्यांनी धाव घेतली.आणि कोळी बांधवांच्या मदतीने या व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले.दरम्यान, नवी मुंबईतील महापालिका रुग्णालयात संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. या व्यक्तीचे प्राण वाचवणारे वाहतूक पोलीस शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केलं.

Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image