होमगार्डच्या समस्यांसाठी गृहराज्यमंत्री शंभूराजेंना साकडे घालणार - राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेना

 

नवी मुंबई - पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून जनसेवेत कर्तव्य पार पाडणाऱ्या होमगार्ड सैनिकांना सध्या स्थितीत अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.वेळोवेळी लढा देऊनही होमगार्ड आजमितीस सुख सुविधांपासून वंचित असल्याने त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लवकरच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेणार असल्याचे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र चिटणीस चंद्रकांत धडके मामा यांनी सांगितले.राज्याच्या सुरक्षिततेसाठी होमगार्ड सैनिकांचे योगदानही पोलिसांइतकेच महत्वाचे आहे.त्यांना जर योग्य त्या जबाबदाऱ्या व सुविधा मिळाल्या तर राज्याला बळकटी मिळू शकते, त्यामुळे त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या प्रयत्न करणार असल्याचेही धडके यांनी सांगितले. 

                       होमगार्ड सैनिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगेश महाजन यांनी नवी मुंबई वाशी या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते.त्यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे चिटणीस चंद्रकांत धडके मामा, सचिव मंगेश लाड, कायदेशीर सल्लागार गोरख बोबडे,सहचिटणीस सचिन लोखंडे, सदस्य सुनील वरेकर, टी टी एम स्टुडिओचे मुख्य हर्षल राणे व इतर सहकारी उपस्थित होते.राज्यात ५० हजारच्या जवळपास होमगार्ड सैनिकांची संख्या आहे.या सैनिकांना वेळेवर वेतन, कायम काम, शासकीय सुवीधा मिळत नसल्याने त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे.केलेल्या कामाचा मोबदलाही वेळेवर मिळत नसल्याने काम करायचे कसे असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक सामाजिक संघटना मैदानात आहेत.त्यातच आता राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने आता या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेतल्याने लवकरच सदर प्रश्न मार्गी लागेल असे या वेळी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या मार्गदर्शनाने सेनेची वाटचाल सुरु असून सर्वप्रथम या विषयी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितू काका खानविलकर यांच्याशी या विषयावर चर्चा करून तो विषय नंतर छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या समोर मांडण्यात येणार असल्याचे योगेश महाजन यांनी सांगितले.


Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image