अग्निशनम विभाग अधिकाऱ्याकडून प्रशासनाची फसवणूक, सेवेतून बडतर्फ करण्याची आरटीआय कार्यकर्त्याची आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई प्रतिनिधी -  एक पत्नी व मुलं असतांनाही दुसरे लग्न करून नवीन संसार थाटणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका अग्निशन विभाग अधिकारी एकनाथ रूपा पवार यांनी महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब नियम २००५ च्या शासन निर्णयाचे  उल्लंघन केले असल्याचे उघडकीस आले आहे.सदरील बाब ही गंभीर असल्याने अश्या अधिकाऱ्यावर तत्काळ बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.

                      एकनाथ रूपा पवार हे अग्निशन सेवेत सहा.केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या श्रीम.लीलाबाई एकनाथ पवार व सविता एकनाथ पवार अश्या दोन पत्नी आहेत.प्रथम पत्नीपासून त्यांना एक मुलगी तर दुसऱ्या पत्नीपासून त्यांना प्रियांका ,गौरी व वरून अशी तीन मुलं आहेत.अश्या प्रकारे एकनाथ पवार यांना दोन पत्नी व चार मुलं आहेत.आजमितीस पवार हे अग्निशन विभागाच्या निवासी इमारतीत राहत असल्याचे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शासकीय अथवा प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ अंतर्गत परिवाराची माहिती देणे बंधनकारक आहे.या माहितीचे उल्लंघन करणारा अधिकारी अथवा कर्मचारी कार्यरत असेल तर त्याच्यावर बडतर्फ करण्याची तरतूद आहे.यानुसार पवार यांच्याकडून वरील कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.सदरील प्रतिबंध कायदा हा फोजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरत असल्याने प्रशासनाने तत्काळ गुन्हा नोंदवणे गरजेचे आहे,मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न करता नियमबाह्य काम करणाऱ्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे असे सांगण्यात येत आहे.यामुळे सदर प्रकरणाची दखल घेऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक समाजसेवकाने लेखी निवेदनाच्या माध्यमातून मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

कोट - काही कारणास्तव मी दोन लग्न केले आहेत.मात्र असा प्रकार करणारा मी एकटाच नाही तर अजून याच विभागात खूप जण आहेत.त्याचीही माहिती मी येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला देतो.त्याचवेळी याची माहिती मी प्रशासनाला ही देणार आहे.

एकनाथ रूपा पवार -  सहा.केंद्र अधिकारी, अग्निशन विभाग 


Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
नवी मुंबई मेट्रो : परिपूर्ण कनेक्टिव्हिटीच्या दिशेने
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image
मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप , पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image