भूखंड व घरे खरेदी विक्रीत करोडोंचा घोटाळा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक, त्या भामट्याचा गॉडफादर कोण ?

नवी मुंबई - भूखंड विक्री व स्वस्त दरात घर देतो सांगून नवी मुंबई सह विविध शहरात सामान्य नागरिक व बँकांना तब्बल १०० कोटींच्या जवळपास मेसर्स इंडिया लड कंपनीचे मालक सुधीर गव्हाळ यांनी गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहे.फसवणूक झाले प्रकरणी त्याच्यावर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.तर अजून बहुतांश जण त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत.नुकताच भूखंड विक्री प्रकरणी त्यांच्यावर एक गुन्हा वाशी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून त्या प्रकरणाचा तपास सुरु आहे.पोलीस विभागातील काही मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वाद या भामट्याला असल्याची चर्चा सुरु असून त्यांच्या जोरावरच तो असे कृत्य करत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

                      सुधीर गव्हाळ असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून तो नवी मुंबईत राहणार आहे.मेसर्स इंडिया लड कंपनी सह इतर कंपन्यांचाही तो मालक असून या कंपन्यांच्या माध्यमातून त्याने अनेकांची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे.त्याच्यावर संगमनेर सिव्हिल कोर्टात अशोक सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी केस सुरु आहे.अहमदनगर चीफ ज्युडिशिअल समोर सुधीर गव्हाळ वर केस सुरु आहे.ठाणे न्यायालयात दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन विरुद्ध सुधीर गव्हाळ अशी केस सुरु आहे.अश्या विविध प्रकारचे खटले त्याच्यावर अनेक वर्षांपासून सुरु असून त्याने गुन्ह्यांचा कहरच गाठला आहे.अनेक गुन्हे न्यायप्रविष्ट असून त्याचा अजून बहुतांश गुन्हे न्यायदरबारी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.सीबीडीमधील एका बांधकाम व्यावसायिकाला जमीन खरेदी विक्री च्या नावाखाली गंडा घातला असता त्याने सुधीर गव्हाळ विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असता न्यायालयात हजर करण्यात आले.व अजून एक गुन्हा परत न्यायदरबारी दाखल झाला.अजून एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या काही जणांनी धाव घेतली असता त्या ठिकाणीही गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सामान्य नागरिकांना जमीन खरेदी विक्रीतून तसेच स्वस्तात घर घेऊन देतो सांगून गंडा घालायचा असा नित्यनियमच गव्हाला याने बनवला असून त्याला पोलीस विभागातील काही उच्च वरदहस्त असल्याची चर्चा तक्रार दार करत आहेत.त्यामुळे सचिन वाझे रुपी सुनील गव्हाळ अखेर कोणाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची फसवणूक करतो या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image