सिडकोच्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीसह भूखंड विक्रीच्या दोन योजनांचा प्रारंभ

नवी मुंबई - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, सिडकोने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ 15 ऑगस्ट रोजी झाला. त्याचप्रमाणे, भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांचाही प्रारंभ यादिवशी करण्यात आला.कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांनी कोविड महासाथीचा प्रसार रोखण्यासाठी केलेले कार्य हे अतुलनीय असून त्यांच्या या कार्याला नमन म्हणून सिडकोने राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्याकरिता विशेष गृहनिर्माण योजना आणली आहे. अधिकाधिक कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांद्वारे अनुक्रमे शहरातील बांधकाम क्षेत्राला चालना मिळण्यासह विविध नोड्समध्ये पेट्रोल पंप/गॅस स्टेशन सुविधा उपलब्ध होणार आहेत. 

                     कोविड-19 महासाथीच्या काळात आपल्या प्राणांची पर्वा न करता डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी,पोलीस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनी अविरपणे आपले कर्तव्य बजावले. कोविड योद्धे बनून, आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी समाजाप्रतिचे आपले कर्तव्य अव्याहतपणे पार पाडले. या कोविड योद्ध्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी संभाव्य प्राणहानी टळली तसेच अत्यावश्यक सेवांचा नागरिकांना अविरतपणे पुरवठा होत राहिला. या कोविड योद्ध्यांप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून या योद्ध्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने ही गृहनिर्माण योजना आणली आहे. सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये 4,488 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एकूण 4,488 घरांपैकी 1,088 घरे ही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (ईडब्लूएस) आणि उर्वरित 3,400 घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत. तसेच वैधानिक तरतुदींनुसार काही घरे ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग प्रवर्गांकरिता राखीव आहेत. या योजनेकरिता अर्ज करण्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांकडे कोविड योद्धा किंवा गणवेषधारी कर्मचारी म्हणून सक्षम अधिकाऱ्याकडून देण्यात आलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे.या योजनेच्या अर्ज नोंदणी ते सोडत, अशा सर्व प्रक्रिया सुलभ व पारदर्श अशा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. या योजनेकरिता अर्जदारांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 15 ऑगस्ट 2021 ते 07 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये पार पडणार आहे, तर योजनेची संगणकीय सोडत 16 सप्टेंबर 2021 रोजी काढण्यात येणार आहे.योजनेच्या सविस्तर माहितीकरिता अर्जदारांनी https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे (स्कीम बुकलेट) काळजीपूर्वक अवलोकन करावे. भूखंड विक्रीच्या उपरोक्त दोन योजनांपैकी एका योजनेंतर्गत नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल (पू.) आणि नवीन पनवेल (प.) नोडमधील निवासी, निवासी तथा वाणिज्यिक वापराचे एकूण 16 भूखंड भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर दुसऱ्या योजनेंतर्गत नवी मुंबईतील उलवे, पुष्पक नगर,खारघर, नवीन पनवेल (पू.) आणि कळंबोली नोडमधील एकूण 8 भूखंड हे इंधन भरणा केंद्र (पेट्रोल पंप/सीएनजी स्टेशन) वापराकरिता भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या दोन्ही योजनांसाठी निविदाकारांच्या ऑनलाइन नोंदणीस 15 ऑगस्ट 2021 पासून सुरुवात झाली आहे. सदर दोन्ही योजना या ई-निविदा तथा ई-लिलाव पद्धतीने पार पडणार असून योजनांच्या सविस्तर माहितीकरिता अर्जदारांनी https://eauction.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजना पुस्तिकेचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.









 





Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image