नवी मुंबई महापालिका शिक्षिकेकडून प्रशासनाची, फसवणूक करणाऱ्या शिक्षिका व मुख्याधापक यास सेवेतून तत्काळ टर्मिनेट करण्याची मागणी

नवी मुंबई - महापालिका माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांनी प्रशासनाची दिशाभूल करून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक लढवून त्याची माहिती दडवून ठेवल्याने त्यांच्यावर तत्काळ बडतर्फची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजे प्रतिष्ठान संघटनेचे नवी मुंबई अध्यक्ष योगेश महाजन यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

                 नवी मुंबई महापालिका माध्यमिक शिक्षण विभागात १ ऑगस्ट २००६ पासून कार्यरत असलेल्या सहा.शिक्षिका ज्योती भोरू बोटे यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या वासिंद ग्रामपंचायत येथे सन २०१३ ते २०१७ या कालावधीत ग्रामपंचायत सदस्य (लोकप्रतिनिधी ) म्हणून निवडणूक लढवुन ,निवडुन येत सदर पदाचा कार्यकाल पूर्ण केला आहे.सदरील कृत्य हे प्रशासनाच्या गैरवर्तणूक मध्ये येत असल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली आहे.त्यांचे हे कृत्य ,महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सन १९४९ चा अधनियम क्र ५९ चे तसेच, लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे (कलम क्र.१३४-क ) असे तीनही नियम अधिनियम मोडत असून त्या शासकीय सेवक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील सेवक हा सेवेत असेपर्यंत लोक प्रतिनिधीत्वाची कोणतीही निवडणूक लढवु शकत नाही.अथवा लढावयाचे असेल तर त्यास कार्यरत पदाचा रीतसर राजीनामा देत सेवेतून कार्यमुक्त होणे बंधनकारक आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या ज्योती भोरू बोटे यांनी प्रशासनाशी कोणताही पत्रव्यवहार व पूर्वपरवानगी न घेता निवडणुक लढवून ,जिंकून सदरील कार्यकाळ नवी मुंबई महापालिका सेवेत कार्यरत असतांना यशस्वीरीत्या पूर्ण केला. २६ जानेवारी ,०१ मे व १५ ऑगस्ट या ध्वजदिना बरोबरच ग्रामपंचायतीच्या सभा .बैठका व इतर विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायत वासिंद क्षेत्रात हजर असलेल्या ज्योती भोरू बोटे यांची शाळेतील दफ्तरावर खोटी हजेरी दाखवून शाळेतील मुख्याधापक अमोल खरसंबळे यांनी वरील कालावधीचा पूर्ण पगार ज्योती भोरू बोटे यांना शाळेत गैरहजर असूनही पूर्ण पगार देत नवी मुंबई महापालिका प्रशासनाची दिशाभूल करून आर्थिक नुकसान केले आहे.म्हणजेच या गैरकृत्यातून शाळेतील मुख्याधापक अमोल खरसंबळे यांनी शिक्षिका करीत असलेले गैरकृत्य लपविणेस आजपर्यंत मदतच केलेली आहे.वरील सर्व बाबी नवी मुंबईच्या करदात्यांचा पैशावर डल्ला मारणे सारखे आहे.त्यामुळेच शिक्षिका ज्योती भोरू बोटे व त्यांना ह्या गैरकृत्यात मदत करणारे अमोल खरसंबळे ह्यांना सेवेतून तत्काळ टर्मिनेट करून त्यांचे विरोधात तत्काळ फोजदारी खटला दाखल करण्यात यावा अशी मागणी राजे प्रतिष्ठान संघटनेचे नवी मुंबई अध्यक्ष योगेश महाजन यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


Popular posts
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
एमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन
Image