सुरक्षा रक्षकांना त्रास देण्याऱ्याची गय केली जाणार नाही, तसेच मानसिक ताण, वाढते वेटिंग, स्वार्थासाठी बँक टू बोर्ड यावरही लक्ष - रा.प्र.सुरक्षा रक्षक सेना


नवी मुंबई - सुरक्षा रक्षक मंडळातील वरिष्ठ सुरक्षकांकडून सुरक्षा रक्षकांना होणारा मानसिक ताण, वाढते वेटिंग, स्वार्थासाठी बँक टू बोर्ड यासह इतर समस्यांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची सानपाडा येथील मुख्य कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत महिला सुरक्षा रक्षकांसह पुरुष सुरक्षा रक्षकांनी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांच्यासमोर समस्यांचा पाढाच वाचला.त्या सर्वच समस्या गंभीर असल्याने लवकरच त्याला वाचा फोडण्यात येईल अशी ग्वाही यावेळी महाजन यांनी दिली.तर त्याचवेळी सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी मैदानात लढण्यासाठी १५ जणांच्या कमिटीची स्थापना करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.यापुढे कोणत्याही सुरक्षा रक्षकाला दडपणाखाली काम करण्याची गरज नाही,तर अन्याय सहन करण्याचीही गरज नाही, आम्ही पाठीशी आहोत असा दिलासा यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांना देण्यात आला. 

                  शनिवार सायंकाळी राजे प्रतिष्ठाण कामगार सेना (प्रणित) राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेनेची महाराष्ट्र राज्य कमिटीची पहिली बैठक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपाध्यक्ष दिलीप माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यामध्ये राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेतील अधिकृत सदस्य यावेळी उपस्थित होत.या उपस्थितीदरम्यान सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा व महाराष्ट्र राज्य या संस्थेत वेटिंगवर असलेल्या सुरक्षा रक्षकांना काम मिळावे,त्यासाठी आस्थापना शोधून त्या त्याचा पाठपुरावा करणे.सुरक्षा रक्षक व महिला सुरक्षा रक्षक यांना वरिष्ठ सुरक्षा रक्षकांकडून होणारा अन्याय  व मानसिक त्रास थांबवण्यासाठी कठोर पावले उचलणे.सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी १५ जणांची कमिटी तयार करणे याविषयी चर्चा करण्यात आली.त्याचबरोबर कमिटीचा महाराष्ट्रभर विस्तार वाढवणे.यावर चर्चा करण्यात आली.चर्चेदरम्यान महिला कर्मचाऱ्यांकडून काही गंभीर समस्या समोर आल्या असून त्या समस्यांची दखल घेत या पुढे महिलांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही,त्यास चोख उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष योगेश महाजन यांनी दिला. 


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू