नवी मुंबई महापालिका सहा.लेखाधिकारी कुसुम राऊळ यांच्याकडून शासकीय कायद्याचे उल्लंघन - राजे प्रतिष्ठान

नवी मुंबई :- महापालिका सहा.लेखाधिकारी कुसुम राऊळ यांना तीन अपत्य असून त्यांच्याकडून महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब नियम २००५ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.यापूर्वीही अग्निशमन दलातील सात कर्मचाऱ्यांकडून या शासकीय कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येताच त्यांच्यावर थेट टर्मिनेटची कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजे प्रतिष्ठान नवी मुंबई अध्यक्ष योगेश महाजन यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.त्यातच कुसुम राऊळ यांचीही माहिती समोर येत असल्याने त्यावरही मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे योगेश महाजन यांनी सांगितले.

               सहा.लेखाधिकारी कुसुम राऊळ याच्या पदोन्नतीची चर्चा असतांनाच त्यांनाही तिसरे अपत्य असल्याचे निदर्शनास आले आहे.तरी त्यांना पदोन्नती दिली जात असल्याने सदरील पदोन्नती वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सहा.लेखाधिकारी कुसुम राऊळ यांचे पतीही नमुमपा परीवहन सेवेत असून त्यांना २००६ नंतर तिसरे अपत्य असल्याचे लेखी पत्राद्वारे समोर आले आहे.संदर्भिय शासन निर्णयानुसार नवी मुंबई महापालिकेचे सेवा नियम २०२१ मधील पान नं १० वरील मुद्दा क्र १२ मधील उपमुद्दा च चे उल्लंघन करणारे आहे.लहान कुटुंब नियम २००५ च्या कायद्याचे मनपा प्रशासनात सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असतानाही मनपा आयुक्त यावर गप्प का असा प्रश्न योगेश महाजन यांनी उपस्थित केला आहे.कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणाऱ्या पदोन्नती कमिटी मधील अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष व्हावे यासारखे दुर्दैव काय असं शकत असा प्रश्न ही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. यापूर्वीही नवी मुंबई अग्निशमन दलातील अग्निशमन अधिकारी एकनाथ पवार, संदेश चन्ने ,गणेश गाडे ,बाबर, शिवराम ढुमणे ,सुर्वे, अमित बोबडे या अधिकाऱ्यांनी द्विभार्या व छोटे कुटुंब या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे बडतर्फ करेपर्यंत यास दिलेला प्रभारी कार्यभार व सोपविलेली जबाबदारी तत्काळ काढणेबाबत महाजन यांच्याकडून मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्रव्यवहार सुरु आहे.असे असतांनाच कुसुम राऊळ यांनाही क्लीन चिट देणे हा प्रकार सुरु असल्याचे महाजन यांनी सांगितले.यावर तत्काळ कारवाई तसेच कठोर पावले उचलली जावीत यासाठी येत्या दोन दिवसात मनपा आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

कोट - नवी मुंबई महापालिका लेखाधिकारी कुसुम राऊळ यांच्याकडून शासकीय नियमाचे उल्लंघन झाल्याची बाब तपासून घेण्यात येईल.त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. 

सुजाता ढोले - अती आयुक्त ,नवी मुंबई महानगरपालिका 

कोट - नवी मुंबई महापालिका लेखाधिकारी कुसुम राऊळ यांच्या शासकीय नियमाचे उल्लंघन झाल्याची बाब प्रशासन विभागाच्या निदर्शनास आणून दिली जाईल.त्या शिवाय पुढील कार्यवाही करता येणार नाही. 

धनराज गरड - मु.ले.वि.अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका 

कोट - असे होत असेल तर हे गैर आहे.पदोन्नती कमिटी ने याबाबत दक्ष राहून  प्रामाणिक व न्यायाने वागणाऱ्या व शासन निर्णयाचा आदर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय देणेसाठी प्रयत्न करावेत.

विजू पाटील - अध्यक्ष नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी संघटना

Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image