सहली दरम्यान मनपा शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार,त्या शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

नवी मुंबई - सहलीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार करणाऱ्या मनपाच्या शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आला आहे.ज्या अधिकाऱ्यांनी त्या नराधम शिक्षकाला पाठीशी घालून आजतायागत कामावर ठेवले आहे अश्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भिमक्रांती जनकल्याण कमिटीचे अध्यक्ष विनय गायकवाड यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

                  विनोद निवृत्ती झापडे असे या शिक्षकाचे नाव असून तो मनपाच्या माध्यमिक विभागात मुलांना शिक्षण देतो.जानेवारी २०१४ मध्ये मनपाच्या माध्यमिक शाळेची सहल गेली असता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झाडपे यांनी लैंगिक अत्याचार केला असता तो प्रकार काही शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा पहिला.त्या विद्यार्थ्यांनी सदर प्रकार शिक्षिका ज्योती विनायक शेळके यांना सांगितला.त्यानंतर त्यांनी याबाबत झाडपे यांना विचारले असता त्यांनी केलेल्या घटनेची कबुली दिली असल्याची बाब गायकवाड यांनी पत्रात नमूद केली आहे.यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने शाळेचे मुख्याधापक अमोल खरसंबळे यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार दिली.तर त्याचवेळी १७ जानेवारी २०१४ रोजी या घटनेची तक्रार उप आयुक्त ,शिक्षण विभाग यांच्याकडेही केली.या तक्रारीनंतर अशोक सोनावणे यांनी झाडपे यांना शिक्षा देऊ असे आश्वासन दिले.तर त्या नंतर अधीक्षक वैराळ यांनीही कारवाईचे आश्वासन दिले.यावर चौकशी करण्यासाठी गायकवाड यांनी शिक्षणाधिकारी योगेश कडुस्कर यांची भेट घेतली असता त्यांनी कायम वैराळ यांना भेटण्यास सांगितले.मात्र कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आजमितीस अत्याचार करणारा शिक्षक मोकाट असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.तर त्याचवेळी या प्रकरणाची फाईल गहाळ झाली असल्याची बाब समोर आल्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.त्यामुळे विनोद निवृत्ती झाडपे (शिक्षक ), अमोल खरसंबळे (मुख्याधापक), अशोक मुधुकर सोनावणे (विस्तार अधिकारी), पटनिगीरे (शिक्षणाधिकारी), वैराळ (अधीक्षक) व योगेश कडुस्कर (शिक्षणाधिकारी) यांच्यावर पोस्को २०१२ अंतर्गत फोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.असे न झाल्यास शासनाच्या व प्रशासनाच्या पटलावर आणणेकामी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.

कोट - अल्पवयीन अत्याचार बाबत आम्हाला निवेदन मिळालं असून त्यासाठी चौकशी समिती नेमली आहे.या चौकशी समितीचा अहवाल येताच योग्य तो निर्णय घेतला जाईल.
जयदीप पवार - शिक्षणअधिकारी ,मनपा 
Popular posts
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची अधिकृत स्थापना , गुढीपाडव्याचे औचित्य साधून नव्या महाराष्ट्र कार्यकारिणीची होणार घोषणा
Image