बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात राजे प्रतिष्ठान कामगार सेनेची नोंदणी

नवी मुंबई :- सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीकृत तसेच प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना असणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेना सज्ज झाली आहे.त्याचवेळी बुधवारी या सेनेची बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात निवेदन देऊन रीतसर नोंदणी करण्यात आली.तर समस्यांचे निवेदन देऊन त्यावरही चर्चा करण्यात आली.या समस्यांवर चर्चा करत असतांना लवकरच तुम्हाला बोर्डात बदल झालेला दिसेल असे यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके यांनी सांगितले.तर गार्ड है तो बोर्ड है याची समजही त्यांनी बोर्ड अधिकारी तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना करून दिली.

                राजे प्रतिष्ठाण कामगार सेना प्रणित राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेनेची स्थापना करण्यात आली असून या सेनेच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांच्या समस्यांना वाचा फोडण्यात येत असल्याचे राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेनेचे अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले.बुधवारी मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके यांना निवेदन देऊन रीतसर नोंदणी करण्यात आली असता यावेळी राजे प्रतिष्ठाण कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण,कार्याध्यक्ष प्रकाश कोळी,सरचिटणीस चंद्रकांत धडके,सल्लागार डॉ गोरख बोबडे, सहचिटणीस सचिन लोखंडे,सुनील वरेकर,नवी मुंबई उपाध्यक्ष डॅनी डिसोझा व राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दिलीप माने,सहसचिव भाऊराव आसवले, सुनील पाटील, सचिन शिंदे, मनीषा रोहम, वैशाली नवले, दीपाली वाघमारे उपस्थित होत्या.


Popular posts
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image