ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम् आरोग्य कवच विमा योजना लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत, ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण, आरोग्य तपासणी व अभिसरण करण्याची कार्यपद्धती होणार निश्चित

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम् आरोग्य कवच विमा योजना लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत, 

ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षणआरोग्य तपासणी व अभिसरण करण्याची कार्यपद्धती होणार निश्चित

मुंबई : राज्यातील 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणेत्यांना ‘शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करणे या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या महत्वाकांक्षी योजनेला कार्यान्वित करण्यासाठी मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

            राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असूनएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त श्रीमती रुबल अग्रवालएन यु एच एमचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवारडी एम ई आरचे उपसंचालक डॉ. अजय चांदनवालेजे जे रुग्णालयातील डॉ. विनायक सावर्डेकरसमाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरेग्रामविकास विभागातील आस्थापना उपसचिवतसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे आस्थापना उपसचिव हे या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.ज्येष्ठ नागरिकांकरिता आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यांबाबत शिफारशी करणेया योजनेअंतर्गत आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करणेबाबतच्या कार्यपद्धतीबाबत शिफारस करणेया योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अहवाल संबंधीत ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त होण्याबाबत व त्यात आजार आढळल्यास त्याचे निदान करणेबाबत तसेच आरोग्य विभागाच्या व इतर योजनेमध्ये अभिसरण करण्याची कार्यपद्धतीबाबत शिफारस करणेइत्यादी बाबींसह शरद् शतम योजनेच्या एकूणच कार्यपद्धतीला निश्चित करण्यासाठी शिफारशी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी या समितीवर नेमण्यात आली असूनसमितीने ठराविक वेळेत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image