हृदयरोग्रस्त १५ दिवसांच्या बेबी डायनावर यशस्वी उपचार मिळाले जीवनदान, मॉरिशिसहुन आलेल्या डायनाला वाल्वुलर पल्मोनरी एट्रेशियाचे निदान झाले होते

नवी मुंबई :-  मॉरिशिसहुन आलेल्या अवघ्या १५ दिवसांच्या बेबी डायनावर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे एक गुंतागुंतीची हृदय प्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.बेबी डायना मॉरिशस येथे २८ जुलै २०२१ रोजी जन्मली आणि तिला जन्मजात गंभीर स्वरूपाचा हृदय विकार असल्याचे समजले.जन्मतःच या बाळाला सायनोसिस झालेला होता, म्हणजे तिची त्वचा, नखे, ओठ आणि डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग निळसर किंवा करडा दिसत होता.बाळाला वाल्वुलर पल्मोनरी एट्रेशिया झाल्याचे निदान करण्यात आले. हा हृदयातील विकार जन्मतःच असतो आणि यामध्ये हृदयातून फुफ्फुसांकडे जाणारा रक्तप्रवाह नियंत्रित करणारा वाल्व उघडतच नाही.बाळ पेटंट डकटस अरट्रेशियसवर जिवंत होते आणि तिला एनआयसीयु म्हणजे लहान बाळांच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

            सरकारच्या मदतीने एका स्थानिक डॉक्टरच्या साहाय्याने बाळाला १२ ऑगस्ट २०२१ रोजी मॉरिशिसहुन मुंबईत आणले गेले.तातडीने बेबी डायनाला स्थिर करण्यात आले व २४ तासांपेक्षा कमी वेळात तिला कार्डियाक प्रक्रियेसाठी कॅथ लॅबमध्ये नेण्यात आले. ही प्रक्रिया सुरु करण्याआधी बाळाची हृदयक्रिया अचानक बंद (कार्डियाक अरेस्ट) पडली. त्यामुळे तिच्यावर अनेक इमर्जन्सी कार्डियाक मेडिसिन्स वापरून शॉक ट्रीटमेंट करावी लागली (४ ते ६ शॉक्स दिले गेले). गेल्या १६ महिन्यात अपोलो हॉस्पिटल्सने मॉरिशसहुन आलेल्या ६० पेक्षा जास्त बाळांवर उपचार केले आहेत.या केसमधील प्रमुख डॉक्टर, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे कन्सल्टन्ट, पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. भूषण चव्हाण यांनी सांगितले, "बाळाची तब्येत अधिकाधिक बिघडू लागली आणि मॉरिशस सरकारने तिला पुढील क्लिनिकल उपचारांसाठी विमानाने अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे पाठवले. बेबी डायनाची तब्येत खूपच खराब होती, या उपचारांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून एक तात्पुरता पेसमेकर बसवण्यात आला आणि प्रति मिनिट १५० या दराने हृदयाचे ठोके सुरु ठेवण्यात आले. सीपीआर सुरु ठेवण्यात आला आणि प्रक्रिया रद्द करण्यात आली."शॉक ट्रीटमेंटनंतर पुढच्या काही मिनिटात बाळाच्या हृदयाने स्वतःची गती पुन्हा प्राप्त केली आणि त्यामुळे पेसमेकर हटवण्यात आला. बेबी डायनाची तब्येत स्थिर व्हावी यासाठी तिला एनआयसीयुमध्ये ठेवण्यात आले.पुढील १० दिवसात बाळाच्या सर्व निओनेटल समस्या दूर झाल्या आणि तिला यशस्वीपणे एक्स्ट्युबेटेड करण्यात आले.पेडियाट्रिक न्यूरॉलॉजिस्टने तपासणी केल्यावर असे लक्षात आले की बाळाचे न्यूरॉलॉजिकल फंक्शनिंग देखील सामान्य होऊ लागले होते, दीर्घकाळपर्यंत सीपीआर आणि कार्डियाक अरेस्टनंतर देखील हे घडत होते हा आणखी एक चमत्कार होता. बेबी डायनाची तब्येत जरा स्थिर झाल्यानंतर डॉ. भूषण चव्हाण यांनी इंटरव्हेन्शनल प्रक्रियेला सुरुवात केली, कार्डियाक अरेस्टचे मूळ कारण ठरलेला, बिघडलेला पल्मोनरी वाल्व उघडण्यासाठी पर्फोरेशन आणि बलून पल्मोनरी व्हाल्वोटॉमी (वाल्वच्या आत बलून कॅथेटर वापरून अरुंद पल्मोनरी वाल्व रुंद करणे) करण्यात आली.अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे सीओओ आणि युनिट हेड संतोष मराठे यांनी सांगितले, "नवजात बाळांमध्ये जन्मजात हृदय रोग (सीएचडी) हा सर्वात जास्त आढळून येणारा आजार आहे आणि दर १००० बाळांमध्ये जवळपास ८ बाळांना हा होतो.  बेबी डायनावर करण्यात आलेले यशस्वी उपचार ही आमच्या हॉस्पिटलसाठी अभिमानास्पद बाब आहे. जागतिक दर्जाच्या तज्ञांच्या आमच्या टीमच्या प्रयत्नांमुळे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे पेडियाट्रिक कार्डियाक उपचारांसाठी पश्चिम भारतातील सर्वाधिक आधुनिक सेंटर्सपैकी एक म्हणून नावाजले जाते.  भारतात हृदय विकारांच्या केसेस वाढत आहेत, जी आता एक गंभीर समस्या बनली आहे आणि महामारी देखील वाढत असल्याने हृदयाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना अधिकच धोका निर्माण झाला आहे." जर वेळेवर उपचार केले गेले नाहीत तर जन्मजात हृदय विकार किती गुंतागुंतीचा होऊ शकतो ते या केसमधून दिसून आले.अपोलो हॉस्पिटल्समधील डॉक्टरांच्या टीमचे उत्कृष्ट नैपुण्य आणि निष्ठा हे याचे आदर्श उदाहरण असून त्यामुळे या बाळाला नवजीवन आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद व समाधान मिळाले.

Popular posts
बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा,अनेक तरुण तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी, राजे प्रतिष्ठान कामगार सेना व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने आयोजन
Image
लाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार
Image
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांकरिता सुधारित नियमावली जाहीर
Image
प्रतीक्षा (वेटिंग) यादीवरील सुरक्षा रक्षकांसाठी राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेना आक्रमक
Image
नवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार
Image