शिवसेना नेते विजय चौगुले यांची पत्रकार योगेश महाजन यांना धमकी, सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

 

नवी मुंबई :- तू अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांची आयुक्तांकडे का तक्रार करतो,तु महापालिकेत भेट असे बोलत फोनवर शिवसेना नेते विजय चौगुले यांनी पत्रकार तथा राजे प्रतिष्ठाण संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष योगेश महाजन यांना धमकी दिल्याने त्या विरोधात त्यांनी सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

            शासकीय कायद्याचे उल्लंघन करीत नियमबाह्य  वागणाऱ्या अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांची मनपा प्रशासन दरबारी कारवाई सुरु आहे.तीच कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणण्याचे काम चौगुले यांनी केल्याने ते कायद्याचे रक्षक आहेत की भक्षक असा प्रश्न उपस्थित झाला आहे असे यावेळी योगेश महाजन यांनी सांगितले.याचदरम्यान भविष्यात जर कोणतीही शारीरिक वा जिवीत हानी झाल्यास त्याला शिवसेना नेते विजय चौगुले व अग्निशमन विभागातील अधिकारी एकनाथ रूपा पवार व त्याचे सहकारी जबाबदार राहतील असा उल्लेख महाजन यांनी आपल्या तक्रारीत नमूद केला आहे.महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब नियम २००५ च्या शासन निर्णयाचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागातील अधिकारी एकनाथ रूपा पवार, संदेश चन्ने, गणेश गाडे, बाबर, शिवराम ढुमणे, सुर्वे,अमित बोबडे यांच्या बाबत पत्रकार तथा राजे प्रतिष्ठाण नवी मुंबई अध्यक्ष योगेश महाजन यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे तक्रार केली आहे.यावर प्रशासन दरबारी चौकशी सुरु आहे.त्यावर कारवाई  म्हणून संघटनेच्या माध्यमातून मनपा आयुक्त अभिजित बांगर व संबंधित अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार सुरु आहे.या प्रकरणाचा पाठपुरावा करत असतांना त्या संबधी माहिती घेण्यासाठी महाजन यांनी बुधवारी दुपारी मनपा अग्निशमन प्रमुख शिरिष आराधवाड यांची त्यांच्या मनपा मुख्यालय दालनात भेट घेतली,त्यावेळी अग्निशमन अधिकारी पी.व्ही.जाधव हेही उपस्थित होते.यावर चर्चा होऊन ते परत आले असता त्या नंतर गुरुवारी दु.१.३७ वाजता त्यांना  ८१०८०१७७३७ या क्रमांकावरून फोन आला व त्यांनी विजय चौगुले यांच्याशी बोला असे सांगून त्यांना फोन दिला.त्यावर पुढे बोलताना चौगुले यांनी विचारले की मला फायर ब्रिगेड वाल्यांचा काय प्रकार आहे.त्यावर त्यांना मी सांगितले कि त्यांची माझ्याकडे तक्रार आली त्यानुसार मी पत्रव्यवहार केला आहे.त्यानंतर तू पत्र कशाला देतो, त्यांना कामावरून काढा, बडतर्फ करा असा पत्रव्यवहार करतो तु काय सुपारी घेऊन काम करतो काय.पत्रकारिता व्यवस्थित कर,तू समोर येऊन बोल,समोरा समोर बोलू, तू उद्या महापालिकेत भेट मग चांगल्या पद्धतीत बोलूया,यासह बहुतांश संभाषण फोनवर झाल्याने त्यांच्या बोलण्यातून दहशत दिसून आली.त्यामुळे भविष्यात मला काही दगाफटका,मारहाण अथवा जीवितहानी झाल्यास त्याला वरील सर्वस्वी अग्निशमन अधीकारी एकनाथ रूपा पवार व त्याचे सहकारी व विजय चौगुले हे जबाबदार असतील अशी नोंद महाजन यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.