महागृहनिर्माण योजना,कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये - सिडकोचे आवाहन

नवी मुंबई - सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना 2018-19 यशस्वी अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा देण्याचा निर्णय सिडकोकडून यापूर्वीच घेण्यात आला असून या संदर्भात संबंधितअर्जदारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. तसेच घरांचा ताबा देण्यासाठी सिडकोने कोणत्याही मध्यस्थ संस्था/व्यक्ती किंवा प्रतिनिधीची (एजंट) नियुक्ती केलेली नाही, असे स्पष्टीकरणही सिडकोकडून देण्यात आले आहे.

                         सिडकोने कोविड-19 महासाथ व त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, 2018-19 महागृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण केले व 1 जुलै 2021 पासून यशस्वी अर्जदारांना टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. घरांचा ताबा देण्यासंदर्भात कोणत्याही व्यक्तिने अथवा संस्थेने कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवल्यास अर्जदारांनी त्यावर विश्वास ठेवू नये. कारण याकरिता कोणत्याही मध्यस्थ संस्था/व्यक्ती किंवा प्रतिनिधीची सिडकोकडून नियुक्ती करण्यात आलेली नाही. योजना पुस्तिकेमध्ये नमूद प्रक्रियेनुसारच घरांचा ताबा देण्यात येत आहे. या संदर्भातील माहितीकरिता अर्जदारांनी केवळ सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ, सिडकोचे फेसबुक,युट्यूब व ट्विटर पेज, सिडकोकडून काढण्यात येणारी प्रसिद्धी पत्रके यांवरच विश्वास ठेवावा किंवा सिडको कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच या संदर्भात मध्यस्थ किंवा प्रतिनिधी म्हणवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती वा संस्थेकडून अर्जदारांची फसवणूक झाल्यास सिडको जबाबदार राहणार नाही.


Popular posts
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image