राजे प्रतिष्ठाण वाहतूक सेनेच्या पहिल्या रिक्षा स्टॅन्डचे नवी मुंबईत उदघाटन

नवी मुंबई :- छत्रपती उदयनराजे भोसले महाराज संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठाण कामगार सेना प्रणित वाहतूक सेनेच्या पहिल्या रिक्षा स्टँडचा शुभारंभ बुधवारी नवी मुंबई एपीएमसी भाजी मार्केट या ठिकाणी करण्यात आला.यावेळी मोठ्या प्रमाणात महिला रिक्षा चालकांसह इतर रिक्षाचालक उपस्थित होते.नवी मुंबई शहरात छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने भविष्यात राजे प्रतिष्ठाण वाहतूक सेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो रिक्षा स्टॅन्ड उभे राहतील अशी ग्वाही यावेळी नवी मुंबई महिला वाहतूक सेना अध्यक्ष वनिता कुचेकर यांनी दिली.

                   यावेळी राजे प्रतिष्ठाण कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण,कार्याध्यक्ष प्रकाश कोळी,सरचिटणीस चंद्रकांत धडके,सल्लागार डॉ गोरख बोबडे, सहचिटणीस सचिन लोखंडे,सुनील वरेकर,महिला अध्यक्ष अर्चना पारठे, साधना पिंपळे, नवी मुंबई उपाध्यक्ष डॅनी डिसोझा, राजे प्रतिष्ठाण सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष दिलीप माने,नवी मुंबई वाहतूक उपाध्यक्ष पारू पाटील,ज्योती राठोड,पूजा तागडे,सोनी वावले,कविता चव्हाण, मनीषा धुमाळ, संजना दुधाणे, निसार खान, निसार शहा यासह बहुतांश चालक उपस्थित होते.राजे प्रतिष्ठाण ठाणे जिल्हा अध्यक्ष योगश महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच या स्टँडचे उदघाटन करण्यात आले असून येत्या महिन्यात अजून काही स्टॅण्डचे उदघाटन करण्यात येईल असे यावेळी वनिता कुचेकर यांनी सांगितले.बुधवारी दुपारी वरील मान्यवरांच्या हस्ते स्टॅण्डचे उदघाटन करण्यात आल्या नंतर काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.त्यावेळी राजे प्रतिष्ठाण कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक यांनी परिस्थितीचा आढावा घेत कसलीही काळजी न करण्याचा चालकांना सल्ला दिला.स्टॅन्ड फलकावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती उदयनराजे महाराज यांची प्रतिमा आहे.त्याला कोण हात लावण्याचा प्रयत्न केला तर सहन केले जाणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला.त्यांच्या या पाठबळाने रिक्षा चालकांमध्ये उत्साह संचारला असून अजून जोमाने काम करण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला आहे.नवी मुबंईत रिक्षा चालकांच्या अनेक समस्या असून त्या सोडवण्यावर भर देण्यात येणार असून त्यासाठी लवकरच मोर्चेबांधणी करण्यात येणार असल्याचे यावेळी राजे प्रतिष्ठाण कामगार सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले.

Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू