मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल मालक सेनेच्या अध्यक्ष पदी विजय नाहटा यांची सर्वानुमते निवड.

नवी मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल सेनेच्या अध्यक्ष पदी शिवसेना उपनेते विजय नाहटा साहेब यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक विविध प्रकारचे स्टॉल असून त्यांच्या अनेक समस्या असतात. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून त्या ठिकणी स्टॉल धारक मालकांची शिवसेना प्रणित युनियन आहे. गेल्या तीन महिन्या पूर्वी युनियनच्या पदाधिकारी व स्टॉल मालक यांनी पत्रव्दारे नाहटा साहेबांना स्टॉल मालक सेनेचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करण्याची विनंती केली होती. त्या नुसार २६ आक्टोबर रोजी  स्टॉल मालक सेनेचे पदाधिकारी आणि स्टॉल मालक यांनी विजय नाहटा साहेबांची भेट घेऊन नाहटा साहेबांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती स्टॉल मालक सेनेचे अध्यक्ष म्हणून घोषणा केली. 

                  यावेळी स्टॉल मालक सेनेचे पदाधिकारी शिवाजी मोरे,नितीन पिसे,फडतरे यांनी विजय नाहटा साहेबांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.आजवर आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते पण आज पासून गोरगरीब जनतेचे तारणहार ,अभ्यासू ,सुशिक्षित आणि तितकेच आक्रमक नेतृत्व आम्हाला लाभले असल्याचा आम्हा सर्व स्टॉल मालक सेनेच्या सदस्यांना आनंद होत असल्याचे नितीन पिसे यांनी सांगितले.तसेच यापुढे विजय नाहटा साहेबांच्या मार्गदर्शना नुसारच स्टॉल मालक सेनेची वाटचाल राहील असे उद्गार शिवाजी मोरे यांनी काढले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव,शहर प्रमुख विजय माने,उत्तर भारतीय सेलचे प्रमुख कमलेश वर्मा,उपशहर प्रमुख प्रदीप बी.वाघमारे, युवा सेनेचे सरचिटणीस प्रवीण कांबळे आणि स्टॉल मालक बहुसंख्येने उपस्थित होते.

Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image