वेटिंग लिस्ट वरील सुरक्षा रक्षकांसाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेना आक्रमक , सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळाला १५ नोव्हेंबर पर्यंतची डेडलाईन - योगेश महाजन

वेटिंग लिस्ट वरील सुरक्षा रक्षकांसाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेना आक्रमक 

सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळाला १५ नोव्हेंबर पर्यंतची डेडलाईन - योगेश महाजन 

नवी मुंबई :- बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या भोंगळ तसेच स्वार्थी कारभाराचा फटका प्रतीक्षा यादीवरील असलेल्या सुरक्षा रक्षकांना पडत असून या पुढे ते कदापिही खपवून घेतले जाणार नाही,असा इशारा देत येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत प्रतीक्षा यादीवरील सर्वच सुरक्षा रक्षकांना कामे द्या,त्यानंतर कोणतेही कारण ऐकून घेतले जाणार नाही असा इशारावजा अल्टिमेटम राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगेश महाजन यांनी बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला दिला आहे.१५ नोव्हेंबर नंतर प्रतीक्षा यादी संपुष्टात न आल्यास विविध पद्धतीने आंदोलने दररोज करण्यात येतील असेही यावेळी योगेश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

                कोरोना काळात कामे नसल्याने अनेकांना मोठ्या संकटांचा सामना करत उदरनिर्वाह करावा लागला.आज कुठे परिस्थिती सावरू लागली असता पुन्हा एकदा प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांच्या कामाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत.त्याचबरोबर शेकडो आस्थापना पुन्हा सुरु झाल्या.तरीही मंडळ जबाबदारी विसरू लागल्याने त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी तसेच प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांच्या कामासाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने पुढाकार घेतला आहे.यासाठी मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके यांच्यासोबत शुक्रवारी सायंकाळी चार वाजता बैठकीचे आयोजन करण्यात होते त्यावेळी प्रामुख्याने या विषयावर चर्चा करण्यात आली.त्याचबरोबर सन २०२० नंतर जी पगारवाढ झाली नाही ती वाढ चार हजार रुपयांनी करून येत्या डिसेंबर नंतर लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.त्यावर पगारवाढीची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु असून लवकरच ती जाहीर करण्यात येईल असे यावेळी डोके यांनी सांगितले.वेटिंग मारण्यासाठीही अनेकांना त्रास सहन करावा लागत असल्याने याबाबत आस्थापनांना सूचना केल्या जातील असेही यावेळी त्यांनी सांगितले.आस्थापनांकडून सिलेक्शन व वेटिंग चा रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्याने त्याचा त्रास सुरक्षा रक्षकांना सहन करावा लागतो.मात्र यापुढे असे होणार नाही त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल असेही यावेळी डोके यांनी स्पष्ट केले.यावेळी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेकडून नियमबाह्य काम करणाऱ्या आस्थापनांची यादी मंडळाला देण्यात आली.त्या यादीवर निरीक्षक करून १५ दिवसात कार्यवाही करत त्या ठिकाणी चार हजार वेटिंग वर असणाऱ्या प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना कामे देण्यात यावीत अशी मागणी महाजन यांनी केली आहे.


Popular posts
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image