अपोलो सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्रिटिकल केयरचा (एसीईसीसी) शुभारंभ

नवी मुंबई :- आशिया खंडातील अग्रणी एकात्मिक आरोग्यसेवा प्रदान करणाऱ्या अपोलोने अपोलो सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्रिटिकल केयरचा (एसीईसीसी) शुभारंभ केला.अपोलो हॉस्पिटल्स हा भारतातील सर्वात मोठे क्रिटिकल केयर प्रदान करणारा समूह आहे, त्यांची २५% पेक्षा जास्तइन-पेशंट बेड क्षमता क्रिटिकल केयरसाठी ठेवण्यात आली आहे.क्रिटिकल केयरला इंटेन्सिव्ह केयर असे देखील म्हणतात.ही देखभाल गंभीर आजारी रुग्णांना दिली जाते, त्यांना याची आवश्यकता वेगवेगळ्या वैद्यकीय स्थितींसाठी असू शकते ज्यामध्ये लगेचच जीवित हानीचा धोका नसतो पण ती उलटू शकते. एसीईसीसी फक्त अपोलो नेटवर्क मध्येच नाहीतर भारत आणि परदेशात नॉन-अपोलो युनिट्ससोबत भागीदारीमार्फत जागतिक स्तरावरील क्रिटिकल केयर प्रदान करणाऱ्या ईआयसीयुचे एकात्मिक नेटवर्क तयार करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करेल.यामुळे आणीबाणीची स्थिती व महत्त्वपूर्ण वैद्यकीय स्थितींमध्ये व्यवस्थापन व उपचारांची व्याप्ती लागू करण्यात मदत मिळेल.

                          अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे चेयरमन डॉ. प्रताप सी रेड्डी यांनी सांगितले, "दरवर्षी लाखो लोकांना गंभीर आजारांमुळे आपले जीव गमवावे लागतात प्राथमिकता, समन्वय, आजार योग्यवेळी लक्षात येणे आणि पायाभूत उपचारांची उपलब्धता यांच्या कमतरते सारख्या कारणांमुळे क्रिटिकल केयर क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.पुराव्यांवर आधारित खर्चात बचत करू शकतील अशा पद्धतींनी परिणामांमध्ये उत्कृष्टता आणून भारत आणि परदेशांमध्ये क्रिटिकल केयर क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची दृष्टी अपोलोमध्ये आहे. हा उद्देश प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अपोलो ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्रिटिकल केयर’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. एसीईसीसी सार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही प्रकारच्या नॉन-अपोलो युनिटसोबत भागीदारीच्या माध्यमातून अपोलो हॉस्पिटल्सच्या बाहेर इतर ठिकाणी देखील अतिरिक्त मूल्य प्रदान करेल, आणि संपूर्ण भारत भरातील रुग्ण, डॉक्टर्स, नर्सिंग होम्स आणि हॉस्पिटल्स साठी हे लाभकारी ठरेल."अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचे क्रिटिकल केअर इंटिग्रेशन अँड ट्रान्सफॉर्मेशनचे संचालक प्राध्यापक रवी महाजन म्हणाले, "सेंटरची सुरुवात भारताच्या दुर्गम भागात उच्च दर्जाचे, किफायतशीर क्रिटिकल केयर कौशल्य प्रदान करण्याच्या अपोलोच्या महत्त्वाकांक्षेला प्रोत्साहन देते. मानक सेटिंग,विकसनशील शिष्टाचार, गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम,शिक्षण आणि संशोधनाद्वारे उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यांसाठी हा केंद्रबिंदू असेल."क्रिटिकल केयर ही क्रिटिकल केयर तज्ञांमार्फत दिली जाते, ज्यांना इंटेन्सिव्हिस्ट देखील म्हणतात.खासकरूनगंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या,वेगवेगळ्या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. त्यांना इंटेन्सिव्ह केयर सेटिंगमध्ये उपयोगात आणली जाणारी उपकरणे, तेथील विविध प्रक्रिया आणि त्यांचे काम ज्यातंत्रज्ञानावर चालते ते तंत्रज्ञान यांची माहिती असणे देखील आवश्यक आहे. ते इतर स्पेशालिटीजसोबत देखील सहयोग करतील, जे व्यक्तिगत केसेसशी संबंधित आहेत.

Popular posts
तंबाखूच्या रागातून स्वाभिमान दुखावल्याने एकाची हत्या ,आरोपीला अटक
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image
अनधिकृत लॉजिंगमुळे शिरवणे गावाचे अस्तित्व धोक्यात, गावातील लॉजिंग अँड बोर्डिंग मध्ये वेश्याव्यवसाय, राहत्या इमारती मध्ये लॉजिंगचे अनधिकृत बांधकाम,अतिक्रमण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ?
Image
भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ जामनेर मध्ये, भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
Image
एमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन
Image