रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल

नवी मुंबई :- सिडको मधील अतिक्रमण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ होतांना दिसून येत असून रोडपाली गावातील अनधिकृत इमारतीला तर उघड उघड अभय दिल्याचे दिसून येत आहे.तक्रार प्राप्त असूनही अधिकारी अनधिकृत इमारतीकडे दुर्लक्ष करत असल्याने यात मोठ्या रकमेची तडजोड झाल्याची चर्चा सुरु आहे. 

             रोडपाली गावातील इंद्रायणी हाऊस च्या बाजूला गेल्या अनेक दिवसांपासून जी + ४ इमारतीचे बांधकाम सुरु आहे.हरी पटेल नामक बांधकाम व्यावसायिक सदरील इमारत उभारत असल्याची चर्चा या गावात असून त्याचे व सिडको अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांचे खास हितसंबंध असलयाचे सांगण्यात येत आहे.सिडको अतिक्रमण विभागातील डावरे व सर्वेंयर इंदिरा यांना या अनधिकृत इमारतीची दोन महिन्यांपूर्वी माहिती मिळूनही त्यांनी त्या तक्रारींकडे पूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले आहे.कारवाई करण्याऐवजी दोघेही नॉट रिचेबल झाले आहेत.जोपर्यंत इमारत पूर्ण बांधून होत नाही तोपर्यंत तक्रारदारांच्या संपर्कातच यायचं नाही असा चंगच या दोघांनी बांधला असल्याचे दिसून येत आहे.जर कुंपणच शेत खात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जी + ४ हि इमारत आता पूर्णत्वास आली असून त्यासाठी पटेल यांनी लाखो रुपये मोजले असल्याचे सांगण्यात येत आहे.कितीही तक्रारी  आल्या तरी कारवाई करायची नाही जणू काही असा पटेल व सिडको अधिकारी यांच्यात करार झाला आहे कि काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Popular posts
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image