रात्रीच्या वेळेस वीज मीटरमध्ये छेडछाड करणारी टोळी गजाआड,कारवाईमुळे नेरूळ येथील वीजचोरांचे धाबे दणाणले

नवी मुंबई - मीटर केबिन मधील मीटरमध्ये वायर जोडून मीटर बायपास करून रात्रभर होणाऱ्या वीज वापराची नोंद होणार नाही अशी व्यवस्था करून मीटरमध्ये  छेडछाड करणाऱ्या इसमास महावितरणच्या नेरूळ विभागाने रंगेहाथ पकडले आहे.त्याच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत अधिनियम २००३, मधील कलम १३८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे व पुढील तपास सुरु आहे.

                       महावितरणमध्ये वीजबिल वसुलीसोबत वीज जोडणी तपासणीची जोरदार मोहीम सध्या सुरु आहे. सदर कारवाई दरम्यान रात्रीच्या वेळेस मीटरमध्ये  छेडछाड होत असल्याचे निदर्शनास आल्याने सखोल चौकशी केली असता असे काम करणारी टोळी सक्रिय आहे असे समजले. सदर माहितीच्या आधारे नेरुळ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून पुढील कारवाई करून एका इसमाला नेरूळ विभागाने रंगेहाथ पकडले.भांडूप परिमंडलातील नेरुळ विभागांतर्गत माहे सप्टेंबर मध्ये वीजचोरी मोहीम तीनही उपविभागांतर्गत घेण्यात आली.५ ऑक्टोबर रोजी शिरवणे गाव,नेरुळ येथे महावितरण नेरुळ विभागातील अधिकारी व कर्मचारी नेरुळ पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी पवार व पाटील सोबत सायंकाळी ६.३० वाजता घटनास्थळी पोहोचले.सायंकाळी सुमारे ७.३० वाजता शिरवणे गावात लीलाबाई निवास या इमारतीत एक अनोळखी व्यक्ती घर नं १००५ चे मीटर केबिन मधील मीटरमध्ये वायर जोडून मीटर बायपास करून रात्रभर होणाऱ्या वीज वापराची नोंद होणार नाही अशी व्यवस्था करून देत असताना दिसून आले. त्यास ताबडतोब पकडण्यात आले असून त्याच्याशी चौकशी केली असता त्याने सदर परिसरातील इतर ७ मीटर मध्ये देखील अशा प्रकारे छेडछाड केले असल्याचे दाखवले. यामध्ये त्याने अशी व्यवस्था केली जेणेकरून रात्रभर होणाऱ्या वीज वापराची नोंद होणार नाही तसेच या मीटरचा वापर सकाळी पूर्वपदावर आणायचा ज्यामुळे सदर वीजचोरी कोणाचाही निदर्शनास येऊ नये.अशा प्रकारे वीज चोरी करीत असलेल्या ग्राहकांवर कार्यकारी अभियंता, नेरुळ, सिंहाजीराव गायकवाड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नेरुळ विभाग  कमलाकर अंबादे,अतिरिक्त कार्यकारी अभियंता नेरुळ उप विभाग किरण धनाईत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाम बीच उपविभाग, अण्णासाहेब काळे, उपकार्यकारी अभियंता, नेरुळ विभाग, प्रशांत बाणाईत, सहाय्यक अभियंता नेरुळ विभाग शर्वरी पाटील, सहाय्यक अभियंता उलवे शाखा, अविनाश राठोड, , सहाय्यक अभियंता नेरुळ शाखा ३ श्रीमती. सारिका आष्टणकर,सहाय्यक अभियंता नेरुळ शाखा १ आशिष इंगळे,सहाय्यक अभियंता नेरुळ उपविभाग वैभव सुरवाडे,तांत्रिक कर्मचारी कु. वर्षा सोळंकी,स्वाती लाड, संदेश म्हात्रे, अशोक साळुंखे यांनी भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई केली.सदर अनोळखी व्यक्तीचे नाव अजय मोहन सामंत आहे.त्याच्यावर भारतीय विद्युत अधिनियम २००३, मधील कलम १३८ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे व पुढील तपास सुरु आहे. सदर कारवाई भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर व वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदर कारवाई दरम्यान श्याम शिंदे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक,नेरुळ पोलीस ठाणे,शिवाजी ढवळे , पोलीस उपनिरीक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर कारवाईमुळे नेरूळ येथील वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत. वीजचोरी एक कीड असून महावितरण सोबतच ग्राहकांचा ही नुकसान होत आहे. ग्राहकांनी अधिकृतपणे वीज वापर करावे व वापरलेल्या विजेचे बिल नियमितपणे भरावे अशी नम्र विनंती भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी केली. अशा कुठल्याही अमिषाला बळी पडू नये तसेच याप्रकारे कोणी जर मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करीत असल्याचे आढळल्यास यापुढे आणखी कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.Popular posts
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ अंतर्गत रंगरंगोटी कामात लाखोंचा घोटाळा , झालेल्या कामाच्या मनपाकडून पुन्हा निविदा,निविदा रद्द करण्याची मागणी
Image
एन्फ्ल्यूएन्झा व कोव्हीड 19 आजाराच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे मनपाचे निर्देश , आरोग्य विभाग हा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अलर्ट मोडवर
Image
1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह
Image
सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान, रेवदंड्याला माणूस घडविणारे विद्यापीठ , सचिन दादांचा डिलीट पदवीने सन्मान म्हणजे सदगुरु परिवारातील सदस्यांचा सन्मान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
शिंदे- फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, राज्यातील सगळ्यात समाज घटकांसाठी तरतुदी
Image