27 व 28 नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीची विशेष मोहीम,आगामी महानगरपालिका निवडणूकीत मतदान करण्यासाठी मतदार नोंदणीची ही सुवर्ण संधी

नवी मुंबई :- मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे वतीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेले आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरीक मतदार नोंदणीस पात्र असल्याचे जाहीर करून या कालावधीत मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीतही मतदान करण्यासाठी मतदार नोंदणीची ही सुवर्ण संधी असून सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना मतदार नोंदणी करता यावी व मतदार नोंदणीपासून कोणीही वंचित राहू नये याकरिता या कार्यक्रमांतर्गत 27 व 28 नोव्हेंबर 2021 या शनिवार व रविवार अशा शासकीय सुट्यांच्या दिवशी मतदार नोंदणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.यापूर्वीही 13 व 14 नोव्हेंबर रोजीच्या शनिवार, रविवारी मतदार नोंदणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

                       या मोहिमेअंतर्गत 27 व 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत या आधीपासून कार्यान्वित असलेल्या पदनिर्देशित नोंदणीच्या ठिकाणी म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये मतदार नोंदणी विषयक केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. येथे मतदार नोंदणीबाबत विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध असणार असून ते त्याच ठिकाणी स्विकारले जाणार आहेत.उपलब्ध अर्जांमध्ये अर्ज नमुना-6 नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, अर्ज नमुना-7 नुसार मतदार यादीतील नावास आक्षेप घेणे किंवा नाव वगळता येईल, अर्ज नमुना-8 नुसार मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये दुरूस्ती करता येईल तसेच अर्ज नमुना -8अ नुसार मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करता येईल. यासाठी अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो, आधारकार्ड, पॅनकार्ड, वीज देयक, पाणी देयक, भाड्याने रहात असल्यास सध्याचा नोंटरी केलेला भाडे करारनामा अशी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.आगामी काळात होणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 1 जानेवारी 2022 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविणे गरजेचे आहे. तसेच यापूर्वी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. तरी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवी मुंबई नागरिकांनी या मतदार नोंदणी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा व आपले नाव त्वरीत समाविष्ट करून घ्यावे तसेच मतदार यादीत यापूर्वी नाव असल्यास असलेले नाव तपासून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image