प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना (डयुटी) कामासाठी संघटनेत नोंदणी करण्याचे आव्हान

नवी मुंबई :- प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना तत्काळ काम मिळावे यासाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेना आक्रमक झाली असून , सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवुन देण्यासाठी भविष्यात होणाऱ्या विविध प्रकारच्या आंदोलनांची राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने तयारी सुरु केली आहे.सुरक्षा रक्षकांसाठी कामे असूनही ते उपलब्ध न करता झोपेचे सोंग घेणाऱ्या बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला झोपेतून खडबडून जागे करण्यासाठी येत्या १५ तारखेनंतर मंडळाला जाब विचारण्यात येणार आहे.त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांनी तत्काळ संघटनेत नोंदणी करून घ्यावी असे आव्हान राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी केले आहे.जेणेकरून ज्या  सुरक्षा रक्षकांना कामाची गरज आहे त्यांना काम देता येईल असे यावेळी महाजन यांनी स्पष्ट केले.

               बहुतांश आस्थापना शासकीय नियमांचं उल्लंघन करून प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांच्या भवितव्याशी खेळत असून त्याला तितकेच सुरक्षा रक्षक मंडळही दोषी आहे.तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशी गत सध्या दोन्ही बाजूला सुरु असून यात प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षक हा देशोधडीला लागत असल्याचे दिसून येत आहे.ज्या आस्थापना येतात त्यातही सेटिंग करून काही सुरक्षा रक्षकांना कामे दिली जातात,हि बाब प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांनी निदर्शनास आणून दिली असल्याने नेमकं मंडळ काम करतं कोणासाठी असा प्रश्न योगेश महाजन यांनी उपस्थित केला आहे.सानपाडा मंडळात तीन हजारांहून अधिक प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षक असून , त्यातील अनेकांची बिकट अवस्था आहे.आपला उदरनिर्वाह चालवायचा कसा असा प्रश्नच त्यांना पडला आहे.आज न उद्या काम मिळेल या आशेने दिवसागणिक बोर्डात फेऱ्या मारणाऱ्या प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना काम मिळण्याऐवजी त्यांच्या पदरी निराशा येते.हा सर्व प्रकार पाहता , नियमबाह्य काम करणाऱ्या आस्थापनांचा राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेकडुन सर्व्हे करण्यात आला असुन आस्थापनांची यादी मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके याना सुपूर्द करण्यात आली व त्या यादीवर काम करून येत्या १५ नोव्हेंबर पर्यत प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना काम मिळवून द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.त्या नंतर काम न मिळाल्यास संघटना आंदोलनात्मक पवित्रा घेईल असा इशाराही देण्यात आला आहे.ज्या पद्धतीने नियमबाह्य काम करणाऱ्या आस्थापनांचा यादी मंडळाला देण्यात आली त्याच प्रमाणे १५ तारखेनंतर प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांची यादीही मंडळाला देण्यात येईल.त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांनी 8689861548 / 9321804481 या संपर्क क्रमांकावर नोंदणी करावी, त्यानंतर त्यांना कामे न मिळाल्यास संघटनेच्या माध्यमातून आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असा इशारा यावेळी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी दिला आहे.

Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image