प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांसाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची मंडळावर धडक - रक्षकांना सहभागी होण्याचे आव्हान , संघटनेसाठी नाही तर स्वतःच्या हक्कासाठी सहभागी व्हा - योगेश महाजन ,रा.प्र.सु.र.से

प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांसाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेची मंडळावर धडक - रक्षकांना सहभागी होण्याचे आव्हान 

संघटनेसाठी नाही तर स्वतःच्या हक्कासाठी सहभागी व्हा - योगेश महाजन ,रा.प्र.सु.र.से

नवी मुंबई :- प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना तत्काळ काम मिळावे यासाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने गत महिन्यात बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके यांची भेट घेतली होती.त्याच वेळी त्यांना नियमबाह्य काम करणाऱ्या आस्थापनांची यादीही सुपूर्द करण्यात आली होती.त्या यादीवर काम करून १५ नोव्हेंबर पर्यंत वेटिंगवरील सुरक्षा रक्षकांना तत्काळ कामावर घ्या.अशी मागणी करण्यात आली होती .त्याच मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सोमवार व मंगळवारी दोन दिवस मंडळावर प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांसह धडक देण्यात येणार आहे.जो पर्यंत प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांना काम मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरु राहणार असून त्यासाठी रविवारी सायंकाळी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे सानपाडा मुख्य कार्यालय सायंकाळी चार वाजता या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत पुढील पाठपुराव्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले.

                प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांवर गेल्या अनेक वर्षांपासून होणारा अन्याय त्याचबरोबर त्यांच्या नावाखाली होणाऱ्या सेटिंग याला कुठे तरी आळा बसावा म्हणून प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षक सेनेने पुढाकार घेतला आहे.जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यत याचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.जर याला आंदोलनाचे स्वरूप आले तर त्याला मंडळ जबाबदार राहील असेही महाजन यांनी सूचित केले आहे.हजारो रक्षक आजमितीस प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) वर आहेत.आज ना उद्या काम मिळेल या आशेने वेटिंग मारून दिवस काढत आहेत.त्यांच्या अपेक्षांना मंडळाने पाने पुसण्याचे कामाचं केले असून त्यांच्या टाळूवरचे लोणीही खाण्याचे कामही मंडळाकडून करण्यात येत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले आहे.यापुढे असं व्हायला नको तसेच नोंदीत रक्षकाला काम मिळायलाच हवं यासाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने एक पाऊल पुढे टाकले आहे.यावर मंडळाला निवेदन दिले असता शेकडो रक्षकांनी याबाबत संपर्क करून आम्ही सोबत असल्याची ग्वाही दिली.त्यांच्याच सहकार्याने आता यापुढे १५ नोव्हेंबर पासून मंडळावर धडक देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले आहे.यासाठी जास्तीत जास्त प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांनी सहभागी होण्याचे आव्हान महाजन यांनी केले आहे.यावेळी प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांनी संघटनेसाठी नव्हे तर स्वतःच्या हक्क्कासाठी मैदानात उतरायचे आहे असे आव्हानच करण्यात आले आहे. बहुतांश आस्थापना शासकीय नियमांचं उल्लंघन करून प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांच्या भवितव्याशी खेळत असून त्याला तितकेच सुरक्षा रक्षक मंडळही दोषी आहे.तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशी गत सध्या दोन्ही बाजूला सुरु असून यात प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षक हा देशोधडीला लागत असल्याचे दिसून येत आहे.ज्या आस्थापना येतात त्यातही सेटिंग करून काही सुरक्षा रक्षकांना कामे दिली जातात,हि बाब प्रतीक्षा यादीवरील (वेटिंग) सुरक्षा रक्षकांनी निदर्शनास आणून दिली असल्याने नेमकं मंडळ काम करतं कोणासाठी असा प्रश्न योगेश महाजन यांनी उपस्थित केला आहे.ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी 8689861548 / 9321804481 या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हान यावेळी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी केले आहे.

Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image