पोलादपूर :- तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथे महाड मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.या वेळी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून गावच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध राहील असे यावेळी आश्वासन दिले.
यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे ,तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार, विभाग प्रमुख अनिल भिलारे, लक्ष्मण मोरे ,उपतालुकाप्रमुख शौकत तार्लेकर, उपविभाग प्रमुख वैभव खेडेकर, केशव खेडेकर ,दशरथ उतेकर,अनिल मालुसरे,अनिल पवार, संदेश कदम, गणेश उतेकर, रामचंद्र साळुंखे, वासंती भावेकर, दत्ता चव्हाण, सिताराम गोळे ,दीपक उतेकर ,निलेश वाडकर, नामदेव गोळे, अर्जुन वाडकर, ज्ञानेश्वर वाडकर ,गणपत गोळे ,नारायण गोळे आदी उपस्थित होते.यावेळी मनोहर शिंदे,मनीषा शिंदे,शालिनी शिंदे,गीता शिंदे,हरिभाऊ शिंदे,अर्चना शिंदे,दगडू शिंदे,वनिता शिंदे यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला