महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये महिलांसाठी अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य

अलिबाग :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनामध्ये जिथे 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत अशा आस्थापनामध्ये तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य आहे. जिथे 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत किंवा ज्या कार्यालयात/आस्थापनात नियुक्ती प्राधिकार्या विरुध्द तक्रारी आहेत, त्या कार्यालय आस्थापनाने त्यांच्याकडील प्राप्त झालेल्या तक्रारी जिल्हा स्तरावरील कार्यरत स्थानिक तक्रार समितीला सादर करावयाच्या आहेत.याबाबत जिल्ह्यात 10 पेक्षा कमी कर्मचारी असणारे प्रत्येक कार्यालय प्रमुखाने आस्थापनाची माहिती आस्थापना कार्यालयाचे नाव, अधिकारी/कर्मचारी पदाचे नाव,आस्थापनावरील संख्या, समिती गठीत आहे किंवा कसे, ही माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास कळवणे आवश्यक आहे. 

              प्रत्येक शासकीय कार्यालये प्रमाणे निमशाकीय कार्यालये, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था, शाखा स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकारी संस्था, संघटना, खाजगी उपक्रम, इंटरप्रायझेस, ट्रस्ट उत्पादक, पुरवठादार, वितरण व विक्री, वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक करमणूक, औद्योगिक, आरोग्य सेवा, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रीडासंस्था, प्रेक्षागृहे, क्रिडासंकुले इ. ठिकाणी अंतर्गत समिती गठीत असणे अनिवार्य आहे.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांनी जिल्ह्यातील कार्यरत आस्थापना यांना ही समिती गठीत करण्याबाबत वेळोवेळी पत्राद्वारे अवगत करुनही काही आस्थापना यांनी अंतर्गत समिती अद्याप गठीत केली नाही. तर काही आस्थापनांनी या कार्यालयास समिती अहवाल या कार्यालयास सादर केला नाही. याकरिता या समित्या गठीत होणे गरजेचे आहे. या कायद्यातील व नियमातील तरतूदीचे व जबाबदारीचे पालन न केल्यास कार्यालयाचे आस्थापनाचे प्रमुख यांना ५० हजार दंडाची तरतूद आहे.संबंधित कार्यालयात समित्या गठीत होण्याचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.कार्यालयातील वरिष्ठ महिला या समितीची अध्यक्ष असेल, या समितीत ५० टक्के पेक्षा जास्त महिलांचा समावेश असावा,या समितीत किमान १ अशासकीय सदस्याचा समावेश असावा,अशासकीय सदस्य रेखा सतीश जोशी, संजय पांडुरंग जाधव यांची नियुक्ती झाली असून या व्यतिरिक्त महिला वकील, डॉक्टर, प्राध्यापक तसेच सेवानिवृत्त व्यक्ती अशा प्रकारचे काम करण्यास तयार असतील तर त्यांचाही अशासकीय सदस्य म्हणून समितीत समावेश करण्यात यावा.तसेच समिती गठनाबाबत अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नीलम पुष्प बंगला, नागडोंगरी, एमआयडीसी ऑफिस समोर, अलिबाग या पत्त्यावर संपर्क साधावा असे  जिल्हा व महिला बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी कळविले आहे.

Popular posts
अपात्र शिक्षकांना पात्र करण्याचा मनपा आयुक्तांचा डाव ? , नवी मुंबई मनपा शिक्षण विभागात २० ते २५ कोटींचा घोटाळा ? , नवी मुंबई मनपातील करार पद्धतीवरील ४९७ कर्मचाऱ्यांवर अन्याय ?
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
'हेल्थ ऑफ द नेशन २०२५' च्या अहवालात धक्कादायक माहिती , भारताला 'सायलेंट एपिडेमिक' चा धोका
Image