नवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार


 नवी मुंबई मनपा आरोग्य विभागात करोडोंचा भरती घोटाळा, ७२ जणांवर कारवाईची टांगती तलवार 

आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांची फसवणूक करणारा तो गोल्डमॅन कोण ?

गाडी ठेकेदाराच्या नावावर वापर, कंत्राटी कामगाराचा ?

नवी मुंबई :- मनपाच्या उद्यान विभागातील घोटाळ्या नंतर वाहतूक विभागातील भरती घोटाळा चव्हाट्यावर असतांनाच आता आरोग्य विभागातील भरती घोटाळा उघडकीस आला आहे.या घोटाळ्यात तब्बल ७२ जणांची फसवणूक केली असल्याचे समोर आले असून प्रत्येकी ३.५० लाख ते ४ लाख रुपये भरती साठी घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.बी वि जी कंपनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाला असल्याचे कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

                नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांचे कंत्राट बी वी जी कंपनीकडे असतांना जानेवारी २०२१ ते मे २०२१ या दरम्यान गरज नसतांनाही ७२ जणांची भरती करण्यात आली.यातील ऐरोली, नेरुळ, तुर्भे, वाशी व बेलापूर या रुग्णालयात कर्मचारी वर्ग नेमण्यात आला.ही भरती करण्यापूर्वी कामगारांकडून ३.५० लाख ते चार लाख रुपये घेण्यात आली असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.या मुलांची भरती भविष्यात धोक्यात येऊ शकते हे माहिती असतांनाही बी वि जी ने कोणत्या आधारे ही भरती केली असा प्रश्न आता कामगारांनी उपस्थित केला आहे.आपले कंत्राट आवाज ना उद्या जाणार आहे हे माहित असतांनाही बी वि जी ने भरती केल्याने आजमितीस ७२ जणांच्या नोकरीवर गदा आली आहे.बी वि जी नंतर ई एम जी कंपनीला सदरील कंत्राट मिळाले असून कंपनीने बी वि जी ने भरती केल्याने अतिरिक्त कामगारांना कामावरून कमी केले आहे.यावर एकाच गदारोळ माजला असता आरोग्य विभागातील या भ्रष्टाचाराला वाचा फुटली आहे.बी वि जी कंपनीचे दोन अधिकारी व कंत्राटी कामगार या सर्वानी मिळून भरती च्या नावाखाली करोडो रुपये घेतले असल्याचे कामगारांनी सांगितले.त्यामुळे आता उद्यान घोटाळा,वाहतूक भरती घोटाळा नंतर आरोग्य विभागातील भरती घोटाळ्यात मनपा आयुक्त अभिजित बांगर काय भूमिका घेतात या कडे कडे सर्व पीडित कामगारांचे लक्ष लागले आहे.

Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू