प्रोजेक्ट हिरानंदनीचा,काम एक्सपॅक इंजिनिअरिंग कंपनीचे, फसवणूक कंत्राटदाराची ?

नवी मुंबई :- भोकरपाडा येथे सुरु असलेल्या हीरानंदनीच्या फॉर्च्यून सिटीत बिल्डिंग पेंटिंगचे काम केलेल्या कंत्राटदाराचे काम पूर्ण होऊनही त्याचे थकीत बिल अद्याप न मिळाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्या प्रोजेक्ट मध्ये काम करणाऱ्या एक्स पॅक इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीकडून त्याचे लाखो रुपयांचे थकीत बिल गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने जगावे कि मरावे असा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित झाला आहे.कर्जदार दिवसरात्र त्रास देत असल्याने भविष्यात माझ्या जीवाची काही हानी झाल्यास त्याला कंपनी जबाबदार राहील असे यावेळी सद्गुरू कृपा एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर महेश पाटकर यांनी बोलतांना सांगितले.

              महेश पाटकर यांनी एक्स पॅक इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीचे हीरानंदनी फॉर्च्यून सिटी भोकरपाडा या ठिकाणी बिल्डिंग पेंटिंग चे काम डिसेंबर २०१९ मध्ये घेतले होते. व ते काम त्यांनी एक वर्ष म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण केले.या कामाचे बिल म्हणून एकूण २३,८८,९८१ /- झाले होते. त्यातील इंजिनिअरिंग कंपनीने १५,१६,८१६/- पाटकर यांना दिले.व उरलेली रक्कम ८,७२,१६५/- अद्याप पर्यंत दिली नाही.तर २,५०,९२२ /- डेबिट नोट जीएसटी रक्कम पण कंपनीने भरलेली नसल्याचे पाटकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.याचा पाठपुरावा करूनही रक्कम मिळत नसल्याने माझी फसवणूक होत असल्याचा अंदाज मला येत आहे.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मी मानसिक तणावात आहे.त्यांनी माझी व माझ्या सरकारची फसवणूक केली असून या सर्व प्रकरणाला एक्सपॅक इंजिनिअरिंग कंपनीचे अधिकारी जूजे फर्नांडिस व केदार महाजन हे जबाबदार असल्याचे पाटकर यांनी यावेळी सांगितले.मला वेळेवर रक्कम न मिळाल्यामुळे माझ्या वर कर्ज झाले आहे. ह्या कर्जामुळे माझ्या घरी कर्ज मागायला कर्जदार येत आहेत व त्यामुळे माझे कौटुंबिक वातावरण विस्कळीत झालेले आहे व माझ्या घरातील व्यक्ती तणावात आहेत. मी या गोष्टीची कल्पना जुजे फर्नांडिस व केदार महाजन यांना वेळोवेळी देत आहे तरीसुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत आहेत.त्यामुळे भविष्यात माझ्या जीवाची काही हानी झाल्यास त्याला एक्स पॅक इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीचे अरविंद गौडा, संतोष बाळकृष्णा शेट्टी, सच्चीदानंद रामाप्पा कांचन, नेनुमल भाटिया, वाल्मिकी खुबचंदानी, ससीकुमार गोपीनाथन नायर व त्यांचे सहकारी असतील असे यावेळी सद्गुरू कृपा एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर महेश पाटकर यांनी बोलतांना सांगितले.   


Popular posts
माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येवू देणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महामंडळाचे नाव लवकरच मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील प्रस्तावित , मराठा आरक्षणाची मागणी कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करून नेरुळ विभाग अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांविरुध्द कारवाई,दगडी चुली, आठ ताडपत्री, 7 दोरखंड, दोन प्लायवूड टेबल, दोन सोफे, दोन बेड, तीन टेबल सामान जप्त, झोपडी धारकांना स्थानिक पोलीस पथक व सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून हटवण्यात यश , नेरुळ विभाग अतिक्रमण विभागाच्या बेधडक कारवाईची राज्य शासनाने दखल घेण्याची गरज ?
Image