लाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार


लाखो सुरक्षा रक्षकांना सानपाडा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीची संधी

एक जानेवारी २०२२ पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरवात

राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचा सुरक्षा रक्षकांच्या रोजगारासाठी पुढाकार

नवी मुंबई :- राज्यातील सर्वात मोठ्या अश्या बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध असल्याने त्यासाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी लाखो तरुणांना सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्या मिळाव्यात म्हणून पुढाकार घेतला आहे.होतकरू व गरजू अश्या तरुणांसाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेच्या वतीने सानपाडा मुख्य कार्यालयात नोंदणी सुरु करण्यात येणार असून त्या नोंदणी प्रक्रियेची सुरवात नवीन वर्षाच्या एक जानेवारी २०२२ पासून करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.
                राज्यातील सर्वात मोठ्या अश्या बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा विस्तार बेलापूर ते पालघर असा विस्तीर्ण स्वरूपाचा असून याच मंडळाच्या वाशी, कल्याण व तारापूर अश्या तीन शाखाही आहेत.याच मंडळाच्या हद्दीत बलाढ्य महानगरपालिका ,नगरपालिका, नगरपरिषदा, आद्योगिक (MIDC) क्षेत्र, मोठ्या कंपन्या, मॉल, कॉलेज, कमर्शिअल कॉम्प्लेक्स तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत.यातील बहुतांश ठिकाणी खासगी कंपन्यांचे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.नियमाने या ठिकाणी बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात नोंदीत असलेल्या सुरक्षा रक्षकाला काम देणं बंधनकारक असतांनाही ते दिले जात नसल्याने आजमितीस लाखो सुरक्षा रक्षक कामापासून वंचित आहेत.अश्या नियमबाह्य आस्थापनांवर कारवाई करण्याऐवजी बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून नेहमी शासनाच्या नावाखाली पळवाटा काढतांना दिसून येत आहेत.यात मंडळ अधिकाऱ्यांचा स्वार्थ असल्याचेही बहुतांश वेळा आढळून आले आहे.या सर्व प्रकाराला मोडीत काढून सामान्य कामगारांना रोजगार यासाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने पुढाकार घेतला आहे.ज्या आस्थापनांमध्ये मंडळाचे सुरक्षा रक्षक कार्यरत नसतील अश्या आस्थापनांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी मंडळाचा सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेने पुढाकार घेतला आहे.यासाठी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुरबाड, भिवंडी, शहापुर, उल्हासनगर, अंबरनाथ, वसई - विरार, तारापूर मधील तरुणांना राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी कामासाठी नोंदणी करण्याचे आव्हान केले आहे.जर गरजवंत तरुणांनी पुढाकार घेतला तर त्यांना नियमाने नोकऱ्याही मिळू शकतील असे आव्हान महाजन यांनी केले आहे.या साठी मोठ्या प्रमाणात नोंदणी होणे गरजेचे असल्याचे यावेळी योगेश महाजन यांनी सांगितले.त्याचबरोबर कोणीही नोकरी लावून देण्याच्या भ्रष्टाचाराला बळी न पडता भरती, नोंदणी, वेटिंग अथवा ड्युटी याविषयी सेनेचे अध्यक्ष योगेश महाजन (८६८९८६१५४८ / ९३२१८०४४८१) या क्रमांकावर संपर्क साधावा असेही महाजन यांनी स्पष्ट केले आहे.बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कामाला लावतो तसेच वेटिंग मारून देतो या नावाखाली हि मोठा भ्रष्टाचार झाला असून जर कोणाचीही फसवणूक झाली असेल तर त्यांनीही राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांच्याशी संपर्क साधावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.भविष्यात या सर्व प्रकाराला आळा बसून लाखो तरुणांना हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी सर्वानीच पुढाकार घेणे गरजेचे असल्याने मोठ्या प्रमाणात नोंदणी होणे आवश्यक आहे.असे यावेळी महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image