माणगाव निजामपूर येथील जीटीएल कंपनीवर आ.भरत गोगावले शिवसैनिकांसह धडकले

माणगाव - निजामपूर येथील जीटीएल कंपनीवर मंगळवारी शिवसैनिकांसह आ.भरत गोगावले यांच्या उपस्थित धडक दिली.स्थानिकांच्या विविध मागण्यांबाबत कंपनी प्रसाशनाला जाब विचारत आ.गोगावले यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.स्थानिकांना कामावर घेणे कामगारांना पगार वाढ करणे कामगारांना कंपनीत काम करत असताना स्वसुरक्षा पुरविणे तसेच कंपनीची अवजड वाहाणे जाऊन खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे आदी मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी शिवसैनिकांनी कंपनीवर धडक मोर्चा काढला होता.यावेळी आ.भरत गोगावले आणि कंपनी प्रशासन यांच्यात चर्चा झाली. स्थानिक ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत त्यांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन कंपनी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.यापुढे स्थानिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि जर तसा अन्याय होत असेल तर त्याला आम्ही पाठिशी घालणार नाही असा इशारा यावेळी आ.गोगावले यांनी प्रशासनाला दिला. या मोर्चात स्थानिक ग्रामस्थांसह निजामपूर विभागातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी कामगारवर्ग महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 

Popular posts
दारावे गावातील ती इमारत कारवाई नंतर पुन्हा अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने उभी ?
Image
सिडको व नवी मुंबई महापालिका हद्दीत शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु, १५ ते २० लाख रुपये प्रति इमारत घेऊन भूमाफियांनी दिला जातो आशीर्वाद ?, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको व मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का ?, अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image