नवी मुंबई :- तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं निधन झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्याच अपघातात त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासहीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.देशाच्या या शूर वीरांना सैनिक फेडरेशनच्या वतीने नवी मुंबई,नेरुळ मध्ये शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली.जनरल विपिन रावत हे सर्जिकल स्ट्राईक व ऑपरेशन ऑल ऑउटचे मुख्य सूत्रधार होते अश्या अनेक युद्धात त्यांनी भाग घेतले ,ते पूर्णपणे देशाला समरप्रीत अधिकारी होते,असा वीर योद्धा दुर्घटने मध्ये शहीद होतो जे आपले खरे हिरो आहे असे यावेळी बोलतांना सैनिक फेडरेशनचे नवी मुंबई अध्यक्ष सुरेश काकडे यांनी सांगितले.
बिपीन रावत बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळाहून सुलूर इथं दाखल झाले होते. त्यानंतर एमआय १७ या हवाईदलाच्या हेलिकॉप्टरने ते तामिळनाडूच्या वेलिंग्टनकडे निघाले होते. वेलिंग्टन इथल्या स्टाफ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार होते. यादरम्यान बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यादेखील त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये होत्या.मात्र, ११.४८ वाजता सुलूरहून निघाल्यानंतर १२.२२ वाजता त्यांच्या हेलिकॉप्टरचा अचानक संपर्क तुटला आणि काही वेळातच हेलिकॉप्टर कोसळल्याचं वृत्त समोर आलं. या दुर्घटनेत रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, सायंकाळी ६.०० वाजल्याच्या सुमारास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृतरित्या बिपीन रावत यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला.त्यानंतर एकच खळबळ माजली.सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतांनाच नवी मुंबई नेरुळ मध्येही सैनिक फेडरेशनच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सैनिक फेडरेशन नवी मुंबई अध्यक्ष सुरेश काकडे व इतर पदअधिकारी यांच्या वतीने CDS जनरल विपिन रावत व त्यांच्यासह १२ अधिकारी व जवान यांच्या श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी काकडे यांनी बोलतांना सांगितले की जनरल बिपीन रावत हे सर्जिकल स्ट्राईक व ऑपरेशन ऑल ऑउटचे मुख्य सूत्रधार होते. अश्या अनेक युद्धात त्यांनी भाग घेतले , ते पूर्णपणे देशाला समरप्रीत अधिकारी होते, अश्या वीर योद्धा दुर्घटने मध्ये शहीद होतो जे आपले खरे हिरो आहे.पण दुर्दैव आहे की कोणत्याही राजकीय पक्षाने, सिने अभिनेत्याने किवा भारतीय खेळाडूने श्रद्धांजली अर्पित केली नाही हि खरोखर खूप निंदनीय बाब आहे.